जॅकलिनचे मानधन बघा... दोन मिनिटांसाठी दोन कोटी! 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 21 August 2019

एका गाण्याच्या मानधनाच्या बाबतीत जॅकलिन फर्नांडिसने बाॅलीवूडच्या इतर ब्युटींना मागे टाकल्याने सध्या तिचीच चर्चा रंगली आहे...

मुंबई : अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या हाती सध्या एकच हिंदी चित्रपट आहे. अनेक सिनेमांत दिसलेली ही श्रीलंकन ब्युटी सध्या आरामच करतेय, असे म्हटले तरी चालेल. तरीही सध्या तिचीच चर्चा रंगली आहे आणि ती तिच्या मानधनामुळे. तिने एका गाण्यासाठी तब्बल दोन कोटीचे मानधन घेतले. विशेष म्हणजे हे गाणे अवघी दोन मिनिटे पडद्यावर दिसणार आहे...

'रेस 3' गल्लापेटीवर दणकून आपटल्यानंतर चित्रपटांची निवड अगदी जपून करायची असे बहुदा जॅकलिनने ठरवलेले दिसतेय. वर्षभरात एकही चित्रपट प्रदर्शित झाला नसला तरी तिचा भाव मात्र वाढला आहे. प्रभास-श्रद्धा कपूरच्या "साहो' चित्रपटासाठी जॅकलिनने "बॅड बॉय' नावाचे एक गाणे केले आहे. त्यामध्ये ती प्रभासबरोबर थिरकताना दिसत आहे. जवळपास दोन मिनिटांच्या या गाण्यासाठी तिने तब्बल दोन कोटी रुपये घेतले आहेत म्हणजे बघा... 

एका गाण्याच्या मानधनाच्या बाबतीत जॅकलिनने बाॅलीवूडच्या इतर ब्युटींना मागे टाकल्याने सध्या तिचीच चर्चा रंगली आहे...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jacqueline Fernandez charged two crore rupees for a two-minute song