बर्थडे दिवशी श्रीलंकन ब्यूटी जॅकलिनला मिळालं हे स्पेशल गिफ्ट

बर्थडे दिवशी श्रीलंकन ब्यूटी जॅकलिनला मिळालं हे स्पेशल गिफ्ट

मुंबईः श्रीलंकन ब्यूटी जॅकलिन फर्नांडिसने काल आपला वाढदिवस साजरा केला. एका व्हर्चुअल फॅन मीटिंगचे आयोजन करत जॅकलिननं तिचा वाढदिवस आपल्या चाहत्यांसोबत साजरा केला. मात्र तिला वाढदिवसानिमित्त एक परफेक्ट गिफ्ट आज मिळालं आहे. किक २ या चित्रपटाची स्क्रीप्ट फायनल झाली आहे आणि त्यामध्ये ती काम करणार आहे. साजिद नाडियादवाला या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत.

सनशाईन गर्ल जॅकलिनचा काल वाढदिवसानिमित्त बॉलिवूडमधील अनेक मंडळींनी फोन केला आणि तिला शुभेच्छा दिल्या. तिच्या काही खास मित्रमंडळींनी आणि लांबच्या नातेवाईकांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. याच दरम्यान कीक २ या चित्रपटाची स्क्रीप्ट लॉक करण्यात आली. 

आज वर्धा नाडियादवालाने सोशल मीडियावर माहिती देत जॅकलिनाला हे बर्थ डे गिफ्ट असल्याचं सांगितलं आहे. कीक हा चित्रपट २०१४ मध्ये रिलीड झाला होता. त्यामध्ये सलमान आणि जॅकलिन मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. जॅकलिनसाठी हा चित्रपट खूप महत्त्वपूर्ण ठरला. कारण तो हंड्रेड करोड क्लबमध्ये गेला. आता त्याच्याच दुसरा भाग निर्माते आणि दिग्दर्शक साजिद नाडियादवाला बनविणार आहेत. गेली दोन-तीन वर्षे या चित्रपटाच्या स्क्रीप्ट काम चालू होते आणि आता ते पूर्ण झाले आहे. सलमान खानच्या तारखा मिळताच चित्रीकरण सुरू होणार आहे असे कळते. 

(संपादनः पूजा विचारे) 

Jacqueline Fernandez gets Kick 2 as birthday gift Sajid Nadiadwala announced

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com