‘अर्थ’च्या रिमेकमध्ये जॅकलीन?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 जून 2019

1982 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अर्थ’ या चित्रपटाचा रिमेक बनत आहे. ज्यात मुख्य भूमिकेसाठी जॅकलीन फर्नांडिसचे नाव चर्चेत आहे. 

अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसचा गेल्या वर्षी प्रदर्शित झालेला ‘रेस 3’ चित्रपट सुपरफ्लॉप ठरला. आता ती 1982 मध्ये प्रदर्शित झालेल्या महेश भट्ट यांच्या ‘अर्थ’ या चित्रपटाच्या रिमेकमध्ये झळकणार असल्याची चर्चा आहे.

या चित्रपटात कुलभूषण खरबंदा, स्मिता पाटील आणि शबाना आझमी यांची भूमिका होती. स्मिता पाटील यांच्या भूमिकेसाठी जॅकलीनच्या नावाची चर्चा सुरू आहे. दाक्षिणात्य अभिनेत्री रेवथी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे.

jack

जॅकलीन फर्नांडिसने मध्यंतरी एका मुलाखतीत म्हटले होते की, 'आपल्या भूमिकांबाबत प्रयोग करण्याच्या दृष्टीकोनातून मी लॉस एंजलिस येथून अॅक्टिंग क्लासेस पूर्ण केली होती. पण मला पूर्णपणे व्यावसायिक चित्रपटांपासून दूर व्हायचे नाही. तरी वेगळ्या धाटणीच्या भूमिका मला करायच्या आहेत.' त्यामुळे आता हे बघणे औत्सुक्याचे असेल की स्मिता पाटील यांनी निभाविलेल्या भूमिकेला जॅकलीन कशाप्रकारे प्रेक्षकांसमोर मांडू शकेल.  

jack

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jacqueline Fernandez to step into legendary actress Smita Patils shoes for Arth remake