अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसच्या दोन कर्मचा-यांना कोरोनाची लागण, जॅकलीननेही केली कोविड-१९ची टेस्ट

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Thursday, 3 September 2020

बॉलीवूडच्या अनेक कलाकारांना कोविड-१९ ची बाधा झाली आहे. त्यातंच आता बॉलीवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसच्या दोन कर्मचा-यांना कोरोनाची लागण झाली आहे.

मुंबई- कोरोना व्हासरने संक्रमित होणा-या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतंच चालली आहे. देशात जवळपास ३७ लाखापेक्षा जास्तलोक सध्याच्या घडीला कोरोनाने संक्रमित आहेत. इतकंच नाही तर बॉलीवूडच्या अनेक कलाकारांना कोविड-१९ ची बाधा झाली आहे. त्यातंच आता बॉलीवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसच्या दोन कर्मचा-यांना कोरोनाची लागण झाली आहे.

हे ही वाचा: आमिर खानच्या मराठी शिक्षकांचं निधन, म्हणाला 'तुमच्यासोबत घालवलेली ती ४ वर्ष...'

अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसचा स्पॉट बॉय आणि मॅनेजर कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. जॅकलीनने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये याविषयीची माहिती दिली आहे. जॅकलीन एका ब्रँडची शूटींग करण्याच्या तयारीत होती. मात्र या माहितीनंतर जॅकलीनचं शूट थांबवलं गेलं. जॅकलीनने बीएमसीच्या अधिक-यांचे मदतीसाठी आभार मानले आहेत. जॅकलीनने लिहिलंय, आम्ही एका ब्रँडसाठी शूट करणार होतो. यातंच खबरदारी म्हणून सगळ्या क्रु मेंबर्सनी कोरोनाची टेस्ट केली. 'मी तुम्हाला सांगू इच्छिते की दुर्देवाने क्रुमधील दोघं कोविड-१९ पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. आम्ही शूटींग थांबवलं आहे कारण लोकांची सुरक्षितता सगळ्यात महत्वाची आहे. दोन्ही पॉझिटीव्ह सदस्य सेल्फ आयसोलेशनमध्ये आहेत आणि त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.'

जॅकलीनने पुढे लिहिलंय, 'टीमच्या इतर सदस्यांचा आणि माझा कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. आम्ही सगळ्या महत्वाच्या नियमांचं पालन करत आहोत आणि सावधगिरी बाळगत आहोत. मी बीएमसी अधिका-यांचे त्यांनी केलेल्या मदतीसाठी आणि मार्गदर्शनासाठी आभार मानते.'

जॅकलीनच्या सिनेमांविषयी सांगायचं झालं तर ती पुन्हा एकदा सलमान खानसोबत झळकणार आहे. दोघेही एकत्र 'कीक' सिनेमाच्या सिक्वेलमध्ये दिसून येतील.   

jacqueline fernandez team members covid 19 test positive  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jacqueline fernandez team members covid 19 test positive