Jacquline fernandiz: जॅकलीनला कपड्यांसाठी दिले तीन कोटी! नवा खुलासा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jacquline fernandiz

Jacquline fernandiz: जॅकलीनला कपड्यांसाठी दिले तीन कोटी! नवा खुलासा

Sukesh chandrashekhar case: बॉलीवूडची अभिनेत्री जॅकलीन ही भलत्याच संकटात सापडली आहे. तिच्यावर ईडीची चौकशी होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी तिला ईडीनं बोलावणं धाडून चौकशी केली होती. हजारो कोटींचा गैरव्यवहार करणारा महाठग सुकेश चंद्रशेखर आणि जॅकलीनचे मैत्रीचे संबंध होते. तिनं त्याच्याकडून महागड्या वस्तुंचा स्वीकार केल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. केवळ जॅकलीनच नाहीतर तिची बहिण आणि आई वडील यांना देखील सुकेशनं महागड्या वस्तु पाठवल्याचे दिसून आले आहे.

आता पुन्हा एकदा धक्कादायक बाब समोर आली आहे. जॅकलीनची स्टायलिस्टनं पोलिसांना दिलेल्या जबाबात जॅकलीनं सुकेशकडून कपड्यांसाठी घेतलेल्या पैशांचा उल्लेख केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जॅकलीनची डोकेदुखी वाढताना दिसणार आहे. सुकेश सध्या हा बिहारमधील तिहार जेलमध्ये आहे. त्या जेलमध्ये बॉलीवूडच्या काही अभिनेत्रींनी त्याची भेट घेतल्याचे यापूर्वी सांगण्यात आले होते. त्यामध्ये नोरा फतेहीचे देखील नाव आले होते. याबरोबरच टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील काही अभिनेत्रींच्या नावाचा उल्लेख होता.

ईडीची चौकशी जसजशी पुढे जात आहे तसे जॅकलीनच्या बाबत नवनवीन खुलासा समोर येताना दिसत आहे. दिल्ली पोलिसांनी जॅकलीनच्या स्टायलिस्टशी चौकशी केली होती. तिचे नाव लिपाक्षी असून तिनं पोलिसांना धक्कादायक माहिती दिली आहे. ती म्हणाली सुकेशनं जॅकलीनला फक्त कपडे खरेदी कऱण्यासाठी तीन कोटी रुपये दिले होते. दिल्लीच्या आर्थिक गुन्हे शाखेनं लिपाक्षीचा जबाब नोंदवून घेतला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा वेगळ्या चर्चेला तोंड फुटले आहे.

हेही वाचा: Ira-Nupur Shikhare: आमिरची लेक होणार पुण्याची सून! जावईबापू पुण्याचा 'जीमकरी'

लिपाक्षी म्हणाली की, मला सुकेश आणि जॅकलीन यांच्यासंदर्भात सारं काही माहिती आहे. सुकेशनं जेव्हा तिला कपड्यांसाठी पैसे द्यायची तयारी दर्शवली तेव्हा त्यानं फोनवरुन मला त्याविषयी सांगितले होते. कोणत्या ब्रँडचे कपडे घ्यावेत असे त्यानं विचारले होते. गिफ्ट खरेदी करण्यासाठी त्यानं मला पैसैही पाठवले होते. असे लिपाक्षीनं म्हटले आहे.

हेही वाचा: Rakhi Sawant: 'राखीशी लग्न नको रे बाबा!' बॉयफ्रेंड आदिलचा नकार

Web Title: Jacquline Fernandiz Sukesh Chandrashekhar Case Stylist Leepkashi Ellawadi Relvealed

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..