'बंटी और बबली अगेन'मध्ये झळकणार हे कलाकार

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 6 June 2019

2005 मध्ये प्रदर्शित झालेल्या "बंटी और बबली' हा चित्रपटाला आणि त्यातील गाण्यांना प्रेक्षकांनी पसंती दर्शवली होती. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा सिक्वेल येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. 14 वर्षांनंतर हा चित्रपट पुन्हा प्रेक्षकांना या चित्रपटाचा सिक्वेल पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे शीर्षक "बंटी और बबली अगेन' असणार आहे.

Related image

"बंटी और बबली'मध्ये अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री राणी मुखर्जी मुख्य भूमिकेत दिसले होते. मात्र, या सिक्वेलमध्ये अभिषेक-राणीची भूमिका "धडक' स्टार्स अभिनेत्री जान्हवी कपूर आणि अभिनेता ईशान खट्टर साकारणार असल्याची चर्चा आहेत. या चित्रपटाच्या कथेवर सध्या काम सुरू आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन वरुण शर्मा करणार आहेत; तर आता "धडक'नंतर जान्हवी आणि ईशान पुन्हा एकत्र काम करणार का, हे पाहणं रंजक ठरेल. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Janhavi Kapoor and Ishan Khattar will be in Bunty or Babli again