Janhvi Kapoor: पदार्पणातील चित्रपटांवरुन मोठं विधान, 'पात्रता नसतानाही...'|Janhvi Kapoor Bollywood actress reveals feel worthless | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Janhvi Kapoor news

Janhvi Kapoor: पदार्पणातील चित्रपटांवरुन मोठं विधान, 'पात्रता नसतानाही...'

Janhvi Kapoor News: बॉलीवूडमध्ये सध्याच्या घडीला सर्वाधिक चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणून जान्हवी कपूरचे नाव घेतले जाते. दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी असणाऱ्या जान्हवीनं वेगळी ओळख निर्माण केली आहे. जान्हवीनं धडक (Bollywood Actress News) आणि गुंजन सक्सेनाच्या माध्यमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. मात्र या दोन्ही चित्रपटांना काही प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला (Bollywood movies) नव्हता. सध्या जान्हवीचा गुड लक जेरी नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला असून त्याला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं दिलेल्या एका मुलाखतीमध्ये जान्हवीनं आपल्या प्रवासाविषयी सांगितलं आहे.

जान्हवीनं सुरुवातीचे तिचे जे दोन चित्रपट होते त्यात काम करणं मला नशिबानं मिळालेली संधी होती. मात्र मी त्यात जास्त काही करु शकले नाही. याचा मला खेद आहे. त्यामुळे भलेही ते माझ्या पदार्पणालीत चित्रपट असतील मात्र त्याचा मला म्हणावा असा काही उपयोग झाला नाही असं वाटतं. यामुळे आपल्याला काही काळ नैराश्याच्या सामना करावा लागला असे तिचे म्हणणे आहे. जान्हवी ही बॉलीवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. 2018 मध्ये तिनं धडकमधून बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवले. शशांक खैतान यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. त्यात इशान खट्टर मुख्य भूमिकेत होता. त्या नंतर जान्हवीनं द कारगील गर्ल, रुही, घोस्ट सारख्या चित्रपटांतून काम केले होते. मात्र त्याला प्रेक्षकांचा जेमतेम प्रतिसाद मिळाला.

हेही वाचा: Video: या कलाकारांनी घेतला पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार

जान्हवी सोशल मीडियावर आपले बोल्ड फोटो शेयर करण्यासाठी ओळखली जाते. त्यामुळे बऱ्याचदा त्यामुळे देखील ती सतत लाईमलाईटमध्ये असते. बीफोयुला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तिनं सांगितलं की, वडिलांमुळे काही चित्रपटांमध्ये मला काम करण्याची संधी मिळाली. धडक आणि गुंजनमध्ये सगळं काही समोर वाढून ठेवलं होतं. त्यामुळे मला त्यात नवीन असं काही करता आलं नाही. कदाचित काही गोष्टींकडे दुर्लक्ष झाले. माझी तेवढी तयारी नसताना मिळालेल्या प्रोजेक्टमधून हाती निराशाच आली. असं जान्हवीनं म्हटले आहे.

हेही वाचा: Video Viral: 'भावा माफ कर!' विल स्मिथनं ख्रिसची मागितली माफी..

Web Title: Janhvi Kapoor Bollywood Actress Reveals Feel Worthless During Dhadak Gunjan Saxena

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top