‘दोस्ताना २’मध्ये जान्हवी

‘दोस्ताना २’मध्ये जान्हवी

‘धडक’ चित्रपटानंतर जान्हवी कपूरकडे हिंदी चित्रपटांची रांग लागली आहे. गुंजन सक्‍सेना यांचा बायोपिक तसेच ‘रूह अफ्जा’ हे दोन चित्रपट तिच्याकडे आहेत. या चित्रपटांव्यतिरिक्‍त ‘दोस्ताना २’ चित्रपटासाठी जान्हवीची निवड करण्यात आली आहे.

२००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दोस्ताना’मध्ये प्रियांका चोप्रा, अभिनेता जॉन अब्राहम आणि अभिषेक बच्चन हे मुख्य भूमिकेत होते. आता या चित्रपटाच्या सिक्वेलमधील मुख्य भूमिका जान्हवी साकारणार असल्याची चर्चा आहे. सिक्वेलमध्ये जान्हवी प्रियांकाने साकारलेली भूमिका वठवणार आहे. या चित्रपटात ती वेगळ्या अंदाजात पाहायला मिळेल. तिच्यासोबत अभिनेता राजकुमार रावदेखील आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com