'नाटू नाटू' नं ऑस्कर जिंकला पण राज्यसभेत उत्तर-दक्षिण वाद रंगला.. भडकलेल्या जया बच्चन म्हणाल्या..Jaya Bachchan On Oscar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jaya Bachchan On Oscar

Jaya Bachchan: 'नाटू नाटू' नं ऑस्कर जिंकला पण राज्यसभेत उत्तर-दक्षिण वाद रंगला.. भडकलेल्या जया बच्चन म्हणाल्या..

Jaya Bachchan On Oscar: राज्यसभेतही साऊथच्या विरोधात बॉलीवूड हे युद्ध रंगलेलं पहायला मिळालं. मंगळवारी राज्यसभेच्या कामकाजा दरम्यान प्रत्येकजण ऑस्कर अॅवॉर्ड जिंकणाऱ्या 'आरआरआर' आणि 'द एलिफंट व्हिस्पर्स' च्या टीमला शुभेच्छा देत होतं.

तेव्हाच नेमकं MDMK आणि AIADMK च्या नेत्यांनी उत्तर-दक्षिण हा वादाचा मुद्दा छेडला. त्यांनी या विजयाचं श्रेय भारतीय सिनेमाला देण्याऐवजी केवळ साऊथ इंडस्ट्रीला देण्याचा प्रयत्न केला.

जया बच्चन यांनी भारतीय सिनेमाची प्रतिनिधी म्हणून या सगळ्याच नेत्यांवर यावरनं पलटवार केला.

चला जाणून घेऊया काय बोलल्या आहेत जया बच्चन.(Jaya Bachchan On Oscar south v/s bollywood debate after the elephant whisperers And natu natu win)

MDMK चे नेता वाइको यांनी संगीतकार एआररहमान यांच्या ऑस्कर विजयाची आठवण करुन दिली. त्यांनी म्हटलं,''मी आपल्या सगळ्यांना ही आठवण करून देऊ इच्छितो की एआररहमान,जे तामिळनाडू मधनं आहेत,त्यांनी भारतासाठी खूप काही आपल्या कलेच्या माध्यमातून केलं आहे''.

AIADMK नेता एम थंबीदुराई यांनी त्यांना मध्येच टोकत म्हटलं की,''डॉक्युमेन्ट्री 'द एलिफंट व्हिस्पर्स' चं शूटिंग उटीमध्ये झालं आहे. मला या गोष्टीचा गर्व आहे''.

तेव्हा राज्यसभेच्या सांसद जया बच्चन यांनी आरआरआर आणि 'द एलिफंट व्हिस्पर्स' च्या टीमला शुभेच्छा देत म्हटलं की,''याने काही फरक पडत नाही की ते उत्तरेकडनं आहेत की पूर्वेकडनं की दक्षिण किंवा पश्चिमेकडून आहेत- सर्वात महत्त्वाचं आहे ते भारतीय आहेत. मला अभिमान आहे की मी त्या इंडस्ट्रीतून आहे आणि तेथील माझ्या सहकाऱ्यांना जागतिक स्तरावर हा सम्मान मिळाला आहे''.

''आरआरआर चे लेखक केवी विजयेंद्र प्रसाद हे केवळ पटकथा लेखक नाहीत ते मोठे कथाकार आहेत आणि या सदनाचे सदस्य देखील आहेत. ही एक मोठी सन्मानाची गोष्ट आहे''.

हेही वाचा: देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

तेव्हा राज्यसभेत उपस्थित एका नेत्यानं जया बच्चन यांना मध्येच टोकलं. जया यांनी त्या नेत्यानं मध्येच टोकलं यावर आक्षेप घेत म्हटलं,''हे कुणीतरी बोलताना मध्येच टोकण्याचा आजार आजकाल वाढत चालला आहे. जेव्हा कुणी सभ्य व्यक्ती बोलत असेल तर अशी असभ्यतेची वागणूक दाखवली नाही पाहिजे''.

तेव्हा सभापती जगदीप धनखड यांनी जया बच्चन यांना शांत करत म्हटलं की, ''मॅडम तुमच्या आवाजात दम आहे...'' एवढंच नाही तर सभापती यांनी संपूर्ण बच्चन कुटुंबाची प्रशंसा केली.