
Jayeshbhai Jordaar: त्या सीननं केला घोळ, प्रदर्शनापूर्वीच सापडला कायद्याच्या कचाट्यात
Bollywood Movie: रणवीर सिंगचा बऱ्याच कालावधीनंतर जयेशभाई जोरदार नावाचा चित्रपट (Bollywood Actor) या महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र प्रदर्शनापूर्वीच तो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्याच्याविरोधात कोर्टात याचिकाही सादर करण्यात आली (Ranveer Singh) आहे. जेव्हा जयेशभाई जोरदारचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता त्यावेळी त्याला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला होता. आतापर्यत पावणेतीन कोटीहून अधिक व्ह्यु (Bollywood Actor) मिळालेल्या या चित्रपटातील एका सीनमुळे त्याची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे तो सीन काढून टाकण्याची मागणी त्या याचिकेतून काढण्यात आली आहे. महिला, (JayeshBhai Jordaar) तिचं गरोदरपण आणि स्त्री पुरुष समानता या विषयावर आधारित या चित्रपटामध्ये गर्भलिंगनिदान करताना दाखवण्यात आले आहे. त्यावरुन आता वादाला सुरुवात झाली आहे.
जयेशभाई जोरदारच्या विरोधात दिल्लीतील हायकोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचे दिसून आले आहे. ट्रेलरमध्ये जयेशची पत्नी ही एका रुग्णालयातून गर्भलिंगनिदान करुन घेते. त्यात ती डॉक्टर जयेशला सांकेतिक भाषेमध्ये मुलगा की मुलगी हे सांगते. हे दृष्य़ काहींना खटकल्याचे दिसून आले आहे. त्याच्याविरोधात काहींनी कोर्टात धाव घेतली आहे. याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे की, या चित्रपटातून गर्भलिंगनिदान विषयीच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आले आहे. त्यामुळे हा विषय कोर्टापर्यत गेला आहे. दिग्दर्शकांनी चित्रपटातून सोनोग्राफीबद्दल जे चूकीचे मेसेज चित्रपटातून दिले आहेत ते सीन काढून टाकावेत. अशी मागणी करण्यात आली आहे.
हेही वाचा: Chandramukhi Review: 'नेभळट दौलतराव, रडकी चंद्रकला' - प्रेमाचं पान रंगलचं नाही
एका इंग्रजी वेबसाईटनं दिलेल्या माहितीनुसार, पवन प्रकाश पाठक यांनी या याचिकेतून जयेशभाई जोरदार चित्रपटावर टीका केली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, कायद्यानं प्रसुतीपूर्वी गर्भलिंगनिदान चाचणी करणे हा गुन्हा आहे. चित्रपटातून अशा प्रकारची दृश्ये दाखवून त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे चित्रपटातून ते दृष्य तातडीनं वगळावे. अशी मागणी कऱण्यात आली आहे.
हेही वाचा: पत्नी अनुष्का शर्मासोबत विराट कोहली पोहोचला जिममध्ये -Video Viral
Web Title: Jayeshbhai Jordaar Trailer Movie Controversy Sonography Test Scene Delhi High Court
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..