जितेंद्र यांची पच्चाहत्तरी 

वृत्तसंस्था
बुधवार, 19 एप्रिल 2017

तरुणांनाही लाजवेल असे चिरतरुण स्वास्थ्य लाभलेले ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र यांनी त्यांचा 75 वा वाढदिवस नुकताच साजरा केला. जंपिंग जॅक अशी ओळख असलेल्या जितेंद्र यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या भव्य कार्यक्रमात असेच सगळ्यांना आपल्या तालावर थिरकायला लावले. त्यांनी स्वत: स्टेजवर डान्स केला आणि सगळ्यांची मनं जिंकून घेतली. सेलिब्रेटिंग जितेंद्र हा कार्यक्रम नुकताच मुंबईतील माटुंगा येथे पार पडला. या वेळी मेगा म्युझिकल कॉन्सर्ट झाली. शान, सोनू निगम अशा गायकांनी या कॉन्सर्टला चार चॉंद लावले. तसेच केक कापून अभिनेते जितेंद्र यांनी आपली पंच्चाहत्तरी साजरी केली. 

Web Title: Jeetendra celebrate his 75 birthday