समलैंगिक संबंधावर आधारित चित्रपटात जरीन खान

समलैंगिक संबंधावर आधारित चित्रपटात जरीन खान

मुंबई : अभिनेत्री जरीन खानने ‘वीर’ बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ती ‘हाऊसफुल २’, ‘हेट स्टोरी ३’, ‘अक्‍सर २’सारख्या अनेक चित्रपटांत झळकली. 

आता लवकरच ती ‘हम भी अकेले तुम भी अकेले’ या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. या समलैंगिक संबंधावर आधारित चित्रपटात ती मुलीच्या भूमिकेत पाहायला मिळाणार आहे. तिच्यासोबत अभिनेता अंशुमन झा मुलाची भूमिका साकारणार आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन हरिश ब्यास यांनी केले आहे. विशेष म्हणजे लवकरच दक्षिण आशियाई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर होणार आहे. हा चित्रपट २०२० साली व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी चित्रपटगृहात 
दाखल होणार आहे. 

web title : Jerine Khan in a movie based on gay relationships

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com