ईशान-जान्हवीचे पुण्यात 'धडक' प्रमोशन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 जुलै 2018

सिनेमाच्या प्रमोशनकरता ईशान-जान्हवी थेट पुण्याला पोहोचले होते. या पुणे भेटीदरम्यान आगा खान पॅलेसला या जोडीने भेट दिली.

पुणे - ‘सैराट’ चित्रपटाचा रिमेक होणार ही बातमी समोर आल्यापासूनच धडक सिनेमाबद्दलची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये लागून राहिली होती. त्यात ईशान खट्टर आणि जान्हवी कपूर ही जोडी यानिमित्ताने बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार ही अजून एक उत्सुकतेची बाब ठरत होती. येत्या 20 जुलै ला प्रदर्शित होणाऱ्या 'धडक' या सिनेमाचं प्रमोशन जोरदार सुरू आहे. सिनेमाच्या प्रमोशनकरता ईशान-जान्हवी थेट पुण्याला पोहोचले होते. या पुणे भेटीदरम्यान आगा खान पॅलेसला या जोडीने भेट दिली.

दरम्यान यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत ईशानने पुण्याच्या वातावरणावर आपलं प्रेम जडलं असून हे शहर खूप सुंदर असल्याचं म्हटलं आहे. तर 'धडक' सिनेमाच्यानिमित्ताने पहिल्यांदाच झालेली पुणे भेट आनंदी करून गेल्याचं जान्हवीने सांगितलं.

तर नुकतच प्रदर्शित झालेल्या 'पहली बार' या गाण्याबद्दल बोलताना ईशान म्हणाला, “हे गाणं अतिशय सुंदर झालं असून यातून चित्रपटाचा सार स्पष्ट होत आहे.”

पत्रकार परिषदेत मिडियाशी मराठीत संवाद साधणाऱ्या जान्हवीने चित्रपटातील आपल्या भूमिकेविषयी बोलताना, “खऱ्या आयुष्यात मी पार्थवीपेक्षा पूर्णपणे वेगळी असून या पात्राकडून मी बऱ्याचशा गोष्टी शिकले असल्याचं” म्हटलं आहे.

Dhadak

पत्रकारपरिषदेव्यतिरिक्त पुणेकरांशी संवाद साधण्याच्या हेतूने ईशान-जान्हवी यांनी मॉललाही भेट दिली आणि प्रेक्षकांचं प्रेम अनुभवलं.

सध्या जोरदार प्रमोशन सुरू असणाऱ्या धडक चित्रपटाचं दिग्दर्शन शशांक खेतन यांनी केलं असून या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओज् आणि धर्मा प्रोडक्शन्स यांनी केली आहे. हा चित्रपट येत्या 20 जुलै ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Dhadak

Dhadak

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jhanvi Kapoor and Ishaan Khattar press conference at pune for Dhadak movie promotion