जान्हवी, इशान करणार झिंगाट? 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मार्च 2017

कधीपासून चर्चा रंगली आहे की श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर आणि शाहिदचा भाऊ इशान खट्टर हे करण जोहरच्या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात करणार! पण या चर्चांना शेवटी पूर्णविराम लागणार असल्याचं दिसतंय. अहो थांबा... तुमच्या मनात विचार आला असेल ना, की अरेच्चा! दोघे कामच करणार नाहीत की काय? पण थांबा, ते येणार आहेत तेसुद्धा मराठी ब्लॉकबस्टर "सैराट'च्या रिमेकमधून. केजो सैराटचा रिमेक करणार असल्याचं सगळ्यांनाच माहीत आहे. परंतु जान्हवी कपूर आणि इशान खट्टर "स्टुडंट ऑफ द इयर 2' या त्याच्या आगामी प्रोजेक्‍टमधून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.

कधीपासून चर्चा रंगली आहे की श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर आणि शाहिदचा भाऊ इशान खट्टर हे करण जोहरच्या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात करणार! पण या चर्चांना शेवटी पूर्णविराम लागणार असल्याचं दिसतंय. अहो थांबा... तुमच्या मनात विचार आला असेल ना, की अरेच्चा! दोघे कामच करणार नाहीत की काय? पण थांबा, ते येणार आहेत तेसुद्धा मराठी ब्लॉकबस्टर "सैराट'च्या रिमेकमधून. केजो सैराटचा रिमेक करणार असल्याचं सगळ्यांनाच माहीत आहे. परंतु जान्हवी कपूर आणि इशान खट्टर "स्टुडंट ऑफ द इयर 2' या त्याच्या आगामी प्रोजेक्‍टमधून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. पण आता या दोघांची "सैराट' एन्ट्री जवळ जवळ फिक्‍सच झाली आहे, असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे मराठीत धुमाकूळ घातलेल्या परश्‍या आणि आर्चीची लवस्टोरी जान्हवी आणि इशान कशी पडद्यावर साकारतायंत ते पाहायला अवघं बॉलीवूड आणि महाराष्ट्र उत्सुक आहेच. 

Web Title: jhanvi kapoor and ishan khatter