Jhund OTT: थिएटरमध्ये फ्लॉप झालेला 'झुंड' ओटीटीवर होणार हिट?

प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेता नागराज मंजुळेच्या (Nagraj Manjule) झुंडबद्दल बरचंसं कौतुक ऐकायला, पाहायला आणि वाचायला मिळालं.
Amitabh Bachchan
Amitabh Bachchan Jhund movie

Jhund Movie: प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेता नागराज मंजुळेच्या (Nagraj Manjule) झुंडबद्दल बरचंसं कौतुक ऐकायला, पाहायला आणि वाचायला मिळालं. जाणकार प्रेक्षकांनी, रसिकांनी आणि समीक्षकांनी झुंडला दिलखुलास (Social Media News) दादही दिली. त्याबद्दल भरभरून लिहिलं. बॉलीवूडमध्ये पदार्पण करताना पहिलाच चित्रपट महानायक अमिताभ यांना घेऊन करणाऱ्या (Amitabh Bachchan) नागराजचा झुंड मात्र बॉक्स ऑफिसवर फारसा प्रभावी ठरला (Bollywood News) नाही. त्याला मोठी कमाई करता आली नाही. त्यामुळे बॉक्स ऑफिसच्या भाषेत सांगायचे झाल्यास तो फ्लॉप झाल्याचे दिसुन आले. त्या दरम्यान मराठीमध्ये दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित पावनखिंड, संजय भन्साळी दिग्दर्शित गंगुबाई काठियावाडी, साऊथचा वल्लीमाई यासारखे चित्रपट प्रदर्शित झाले होते.

झुंड प्रदर्शित होण्यापूर्वी त्याच्याविषयी मोठ्या प्रमाणात वातावरण निर्मिती करण्यात आली होती. बॉलीवूडमधील स्टार अभिनेते आमिर खान, दाक्षिणात्य अभिनेता धनुष यांनी या चित्रपटाचे कौतुक करत प्रेक्षकांना हा चित्रपट पाहण्याचे आवाहन केले होते. मराठीतील प्रसिद्ध अभिनेता जितेंद्र जोशी हा झुंड पाहून प्रचंड भारावून गेल्याचे दिसून आले. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर देखील झुंड चांगली कमाई करेल असा अंदाज होता. मात्र तसे झाले नाही. आता प्रेक्षकांसाठी आनंदाची बाब म्हणजे हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. त्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा वेगळ्या अनुभवाला सामोरं जाण्याची पर्वणी प्रेक्षकांना मिळणार आहे. झोपडपट्टीतील मुलांना फुटबॉलचं प्रशिक्षण देणाऱ्या विजय बारसे यांच्या आयुष्यावरील या चित्रपटामध्ये गरीबी, त्यात वाढलेल्या मुलांचा संघर्ष. त्यांना पडणारे प्रश्न याविषयी प्रभावी भाष्य करण्यात आले आहे.

Amitabh Bachchan
Photo Viral: मुलासोबत आमिर खान घेतोय आंब्याचा आस्वाद!

अमिताभ बच्चन य़ांची मुख्य भूमिका असलेला झुंड हा झी 5 या ओटीटीवर प्रदर्शित केला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याच्या ओटीटी प्रिमिअर विषयी नागराजनं सांगितलं की, झुंड ही प्रवाहाच्या विरोधात संघर्ष करणाऱ्यांची कथा आहे. प्रेक्षकांना विचार प्रवृत्त करणारा हा चित्रपट आपल्याला खूप काही गोष्टी शिकवून जातो. समाजातील अनेक वाईट प्रवृत्तींवर सडेतोडपणे भाष्य करणारा हा चित्रपट हा आता ओटीटीवर येतो आहे. याचा आनंद वाटतो. सहा मे रोजी झुंड हा ओटीटीवर पाहता येणार आहे.

Amitabh Bachchan
IPL 2022: स्टोइनिस क्लीन बोल्ड झाल्यामुळे संतापला, थेट घातल्या शिव्या... Video Viral

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com