Jiah Khan केसमध्ये सीबीआय कोर्टाची ऑर्डर कॉपी समोर.. ज्यामध्ये म्हटलं गेलंय,'सूरज निर्दोष तर जिया खान होती..' Jiah Khan Case Update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jiah Khan Case Update

Jiah Khan केसमध्ये सीबीआय कोर्टाची ऑर्डर कॉपी समोर.. ज्यामध्ये म्हटलं गेलंय,'सूरज निर्दोष तर जिया खान होती..'

Jiah Khan Case Update: बॉलीवूड अभिनेत्री जिया खानच्या आत्महत्येला १० वर्ष झाली आणि काही दिवसांपूर्वी या केसचा निकाल लावत सीबीआय कोर्टानं तिचा एक्स बॉयफ्रेंड सूरज पांचोलीची या केसमधून निर्दोष मुक्तता केली आहे. यानंतर सूरज पांचोलीनं सुटकेचा निश्वास टाकला आणि थेट पोहोचला दिल्लीच्या गुरुबंगला साहब यांच्या चरणी माथा टेकायला.

या केसमधील सीबीआय कोर्टाची ऑर्डर कॉपी डिटेल्स आता समोर आली आहे ज्यामध्ये सूरज पांचोलीच्या बाजूनं निर्णय दिला गेला आहे.(Jiah Khan relationship with sooraj pancholi suicide case share special cbi court order)

सीबीआय कोर्टाच्या ऑर्डर कॉपीविषयी बोलायचं झालं तर यामध्ये म्हटलं गेलं आहे की जिया खानजवळ नेहमीच हा पर्याय होता की सूरज पांचोलीसोबतच्या नात्यातून बाहेर पडून तिनं आयुष्यात पुढे जावं. पण ती खूपच इमोशनल होती आणि ती त्यातनं कधी बाहेर आलीच नाही.

या प्रकरणात असं देखील सांगितलं गेलं आहे की सूरज पांचोलीसोबत रिलेशनशीपमध्ये असण्याआधी देखील तिनं आत्महत्येचा प्रयत्न केला होता. पण यादरम्यान सूरज पांचोलीनेच तिला वाचवलं होतं. एवढंच नाही तर तिला डिप्रेशनमधून बाहेर येण्यासाठी देखील सूरजनं सहकार्य केलं होतं.

रिपोर्टमध्ये स्पष्ट म्हटलं गेलं आहे की जिया खान कधीच सूरज पांचोलीसोबतच्या नात्यातून बाहेर आलीच नाही. ती कायम त्या नात्यात गुंतून राहिली आणि याचा परिणाम ती डीप्रेशनमध्ये गेली. यासाठी सूरजला जबाबदार ठरवलं जाऊ शकत नाही.

माहितीसाठी सांगतो की याप्रकरणातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर सूरज पांचोलीनं सर्वांचे आभार मानले. बोललं जात आहे की सलमान खान पासून इंडस्ट्रीतील अनेकांनी सूरज पांचोलीला या केसदरम्यान सहकार्य केलं आणि त्याला पाठिंबा दिला.

जिया खान केसमध्ये गुंतल्यामुळे सूरज पांचोली गेली अनेक वर्ष लाइमलाइटपासून दूर होता आणि त्यानं फार सिनेमे देखील केले नाहीत. पण आता सूरज पांचोली कमबॅकसाठी पूर्ण तयार आहे. तो लवकर 'हवा सिंग' सिनेमात दिसेल. या सिनेमात तो देशाचा हेवी वेट बॉक्सर हवा सिंगची मुख्य भूमिका साकारणार आहे.

टॅग्स :bollywood