जॉनची आणखी एक निर्मिती 

वृत्तसंस्था
सोमवार, 17 एप्रिल 2017

बॉलीवूडचा माचो मॅन जॉन अब्राहम "ऍक्‍शन हिरो' म्हणून जास्त फेमस आहे. "रॉकी हॅण्डसम', "फोर्स' आणि "धूम'मध्ये देमार ऍक्‍शन केल्यानंतर त्याने "विकी डोनर'सारखा हटके अन्‌ जाहीरपणे न बोलल्या जाणाऱ्या विषयावर चित्रपट काढून स्वतःतला प्रोफेशनल निर्माता इंडस्ट्रीला दाखवला. आपल्या "जेए एंटरटेन्मेंट' बॅनरखाली त्याने "विकी डोनर'बरोबरच वेगळ्या धाटणीचा "मद्रास कॅफे' चित्रपट बॉलीवूडला दिला.

आता त्याला तिसऱ्या चित्रपटाच्या निर्मितीचे वेध लागले आहेत. चित्रपटाचा विषय ऐकाल तर थक्क व्हाल. 1998 मध्ये झालेल्या पोखरण अणुचाचणीवर आधारित सिनेमा जॉन आणतोय. जॉनच्या जेए एंटरटेन्मेंटबरोबरच "रुस्तम' चित्रपटाचे निर्माते क्रिआर्ज एंटरटेन्मेंट त्याची सहनिर्मिती कंपनी आहे. अर्थातच चित्रपटातत जॉन मुख्य भूमिकेत असेल. "मद्रास कॅफे' माजी पंतप्रधान राजीव गांधी हत्या प्रकरण आणि श्रीलंकेतील यादवी युद्धावर आधारित होता. त्यात जॉन एका आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत होता. जॉन चित्रपटाबद्दल सांगतो, "मी नेहमीच चित्रपट बनविण्याच्या घाईत नसतो. मी वेगळ्या विषयांच्या शोधात असतो. जे विषय सध्याच्या परिस्थितीशी निगडित असतात किंवा सामाजिक-राजकीय आणि अर्थकारणाशी संबंधित असतील तेच मी निवडतो. हा विषय मला हवा तसाच आहे.' 

अणुचाचणीवरील चित्रपटाचे नाव काय असेल हे मात्र अजून ठरलेले नाही; पण त्याचे चित्रीकरण 20 एप्रिलपासून सुरू होणार आहे. 8 डिसेंबरला तो प्रदर्शित होईल. 

Web Title: John Abraham’s next production to be based on Pokhran nuclear test of 1998