जॉन अब्राहम करणार 'अॅटॅक'

Attack Movie
Attack Movie

मुंबई : जॉन अब्राहम काही दिवसांमध्ये अॅटॅक करणार असल्याची माहिती त्यानेच ट्विटरवरून दिली आहे. हे ऐकून तुम्हाला धक्का बसला असेल, पण जॉन काही खराखुरा अॅटॅक करणार नसून त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव 'अॅटॅक' आहे. दिग्दर्शक लक्ष्मण राज आनंद या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून या चित्रपटाद्वारे ते निर्मिती क्षेत्रात उतरणार आहेत. हा एक अॅक्शन थ्रिलर चित्रपट असणार आहे. 

अॅटॅक हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असून होस्टेज क्रायसिस हा चित्रपट विषय आहे. यात जॉन काउंटर ऑपरेशनदरम्यान हल्ला करणाऱ्या पथकाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. लक्ष्य यांनी चित्रपटाची पटकथा लिहिली असून या चित्रपटाच्या चित्रीकरणास डिसेंबरमध्ये सुरूवात होणार आहे. 

जॉनच्या जेए एंटरटेन्मेंट आणि क्याटा प्रॉडक्शन या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. ''आम्ही चित्रपटाच्या कथेवर विश्वास ठेवतो. धक्कातंत्र वापरून चित्रपटांची निर्मिती करणे आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. अॅटॅक हा त्यापैकीच एक कडक आणि थ्रिलर चित्रपट आहे. ज्यामध्ये चांगल्या कथानक आणि शैलीचा वापर केला जाणार आहे," असे जॉनने म्हटले आहे. 

"जॉनसोबत आणि त्याच्या प्रॉडक्शन बॅनरसोबत काम करणे, हे नक्कीच आनंददायी आहे. कारण आम्ही चित्रपटाचा एकसारखाच विचार करतो. आम्ही सर्वजण या आगामी चित्रपटाची उत्साहाने वाट पाहत आहोत,'' असे मत अजय कपूर यांनी व्यक्त केले. 

जॉनने अभिनय केलेला 'बाटला हाऊस' हा आगामी चित्रपट येत्या 15 ऑगस्टला (स्वातंत्र्यदिनी) प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपटही सत्य घटनेवर आधारित असून त्याचे चाहते हा चित्रपट कधी प्रदर्शित होतो याची वाट पाहत आहेत. अॅटॅक हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असल्यामुळे आतापासूनच या चित्रपटाची उत्सुकता निर्माण झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com