Johnny Depp Vs Amber Heard | जॉनी डेपने जिंकला मानहानीचा खटला; एँबर हर्डला मोठा धक्का | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Johnny Depp VS Amber Heard
जॉनी डेपने जिंकला मानहानीचा खटला; एँबर हर्डला मोठा धक्का

जॉनी डेपने जिंकला मानहानीचा खटला; एँबर हर्डला मोठा धक्का

हॉलिवूड स्टार जॉनी डेप आणि त्याची पूर्वपत्नी एँबर हर्ड यांच्यातला मानहानीचा खटला सध्या सुरू असून त्याची जोरदार चर्चा आहे. हा खटला जॉनी डेपने जिंकला आहे. त्यामुळे आता एँबरला १५ मिलियन डॉलर्सची नुकसान भरपाई जॉनी डेपला द्यावी लागणार आहे. प्रचंड गोंधळ, अनेक पुरावे, साक्षी आणि तासन् तास चाललेल्या सुनावणीनंतर सात न्यायाधीशांच्या खंडपीठाने हा निकाल दिला आहे. (Johnny Depp Vs Amber Heard)

हेही वाचा: भारतीय सिनेमा जगभर विस्तारण्यात PM मोदींचा महत्वाचा वाटा - अक्षय कुमार

न्यायाधीशांनी एँबरसोबत जॉनी डेपलाही (Johnny Depp) मानहानीच्या काही प्रकरणांमध्ये दोषी ठरवलं आहे. त्यालाही एँबरला २ मिलियन डॉलर्सची नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे. सात सदस्यीय न्यायाधीशांना अंतिम निर्णय देण्याआधी तीन दिवस विचार विमर्श केला.

हेही वाचा: विवेक अग्निहोत्रींचे ऑक्सफोर्ड युनिवर्सिटी वर गंभीर आरोप, शेअर केला VIDEO

न्यायाधीशांनी निर्णय दिल्यानंतर जॉनी डेपच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. त्याचे चाहते न्यायालयाच्या बाहेर मोठ्या संख्येने एकत्र आले होते. जॉनी डेप आणि एँबर हर्ड (Amber Heard) या दोघांमधला हायप्रोफाईल खटला २०१८ मधल्या एका लेखापासून सुरू झाला. जॉनी डेपची पूर्वपत्नी एँबरने २०१८ मध्ये एका वर्तमानपत्रात लेख लिहिला होता, त्यात तिने आपण घरगुती हिंसाचाराचा बळी ठरल्याचा उल्लेख केला होता. हा लेख प्रकाशित झाल्यानंतर जॉनी डेपने तिच्यावर मानहानीचा खटला दाखल केला होता.

Web Title: Johnny Depp Amber Heard Case Depp Won The Defamation Suit

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :hollywood
go to top