बर्थ डे स्पेशल: कधीकाळी ठिकठिकाणी भटकत पेन विकायचे जॉनी लीवर, नंतर बनले कॉमेडीचे बादशाह

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Friday, 14 August 2020

करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये जॉनी लीवर स्टेजवर स्टँडअप कॉमेडी करायचे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज त्यांच्याविषयीच्या काही खास गोष्टी जाणून घेऊया.

मुंबई- आपल्या अचूक टायमिंगने सगळ्यांना हसवणारा अभिनेता जॉनी लीवर यांचा आज १४ ऑगस्ट रोजी वाढदिवस. जॉनी यांचं खरं नाव जॉन प्रकाश राव जनुमाला हे आहे. करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये जॉनी लीवर स्टेजवर स्टँडअप कॉमेडी करायचे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज त्यांच्याविषयीच्या काही खास गोष्टी जाणून घेऊया.

हे ही वाचा: 'त्या' गुलमोहराच्या झाडासाठी अमिताभ बच्चन कोरोनामुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच चक्क घराबाहेर पडले

जॉनी लीवर यांचा जन्म आंध्र प्रदेशमध्ये झाला. जॉनी यांचे वडिल प्रकाश राव जनुमाला हिंदुस्तान लीवर फॅक्टरीमध्ये काम करायचे. जॉनी त्यांच्या भावा-बहिणींमध्ये सगळ्यात मोठे होते. त्यांना दोन भाऊ आणि तीन बहीणी आहेत. जॉनी यांचं कुटुंब खूप गरीब होतं. आर्थिक अडचणींमुळे त्यांनी सातवीनंतर शिक्षण सोडून दिलं. शिक्षण सोडून जॉनी यांनी कुटुंबाची मदत करायचा निर्णय घेतला. ते गल्लोगल्ली सेलिब्रिटींची नक्कल करत पेन विकायचे. यादरम्यान ते सेलिब्रिटींसारखे डान्स देखील करायचे. त्यानंतर त्यांच्या वडिलांनी त्यांना हिंदुस्तान लीवर कंपनीमध्ये काम मिळवून दिलं.

Johnny Lever Age, Wife, Children, Family, Biography & More ...

फॅक्टरीमध्ये काम करताना जॉनी त्यांच्या अभिनय आणि कॉमेडी अंदाजाने सगळ्यांना हसवायचे. इथुनंच त्यांचं नाव जॉनी लीवर असं झालं. ते स्टेज शो करायचे. अशाच एका स्टेज शो दरम्यान सुनील दत्त यांची नजर जॉनीवर पडली. त्यांनी 'दर्द का रिश्ता' या सिनेमातून जॉनी लीवरला पहिला ब्रेक दिला. यानंतर मग जॉनी यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. तेव्हापासून ते आत्तापर्यंत जॉनी जे काम करत गेले त्याला प्रेक्षकांची वाहवा मिळाली.

कित्येक सिनेमांमध्ये ते सहकलाकार म्हणून समोर आले. प्रेक्षकांना त्यांच्या हिरोंच्या भूमिकेपेक्षा त्यांची कॉमेडीच खूप आवडायची. त्यांच्या काही महत्वाच्या लोकप्रिय सिनेमांमध्ये 'कुछ कुछ होता है', 'अनाडी नंबर वन', 'कहो ना प्यार है', 'नायक', 'कभी खुशी कभी गम','चालबाज', 'चमत्कार', 'बाजीगर', 'राजा हिंदुस्तानी', 'जुदाई', 'येस बॉस', 'इश्क', 'आंटी नंबर वन', 'दुल्हे राजा', 'फिर हेरा फेरी', 'गोलमाल ३', 'हाऊसफुल ४' यांसारख्या सिनेमांचा समावेश आहे.     

johnny lever birthday special here about his life facts  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: johnny lever birthday special here about his life facts