भारती सिंहच्या ड्रग्स प्रकरणावर जॉनी लिवर यांची प्रतिक्रिया, 'ड्रग्सचा ट्रेंड थांबवा नाहीतर...'

दिपाली राणे-म्हात्रे
Monday, 23 November 2020

भारती सिंह ड्रग्स केसमध्ये फसल्यानंतर इंडस्ट्रीमध्ये पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे. आता जॉनी लिवरने हर्ष आणि भारतीच्या अटकेवर आता त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई- टीव्हीची प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिम्बचिया मोठ्या अडचणीत सापडले आहेत. भारती आणि तिचा पती हर्षला एनसीबीने अटक केली आहे. यानंतर दोघांना मुंबईतील किला कोर्टाने ड्रग्स केसमध्ये न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मात्र हर्ष आणि भारतीने जामिनासाठी कोर्टात अर्ज केला आहे. आज यावर सुनावणी आहे. भारती सिंह ड्रग्स केसमध्ये फसल्यानंतर इंडस्ट्रीमध्ये पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे. आता जॉनी लिवरने हर्ष आणि भारतीच्या अटकेवर आता त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा: शूटींगआधी कतरिना कैफने केली कोरोना टेस्ट, सोशल मिडियावर व्हिडिओ व्हायरल  

जॉनी लिवरने टाईम्स ऑफ इंडियासोबत बोलताना सांगितलं की, ''मी भारती आणि हर्षला केवळ एक गोष्ट सांगू इच्छितो की जेव्हा पण तुम्ही बाहेर याल तेव्हा तुमच्यासोबत काम करणा-या लहान मोठ्या प्रत्येक कलाकाराला तुम्ही विनंती करा त्यांनी ड्रग्सचं सेवन करु नका.' जॉनी लिवरने पुढे सांगितलं की, संजय दत्तला पाहा. त्याने जगासमोर कबुल केलं आहे की तो ड्रग्स घेत होता आणि कसा तो यातून बाहेर आला. यापेक्षा मोठं उदाहरण काय असू शकतं? तुम्ही तुमची चूक स्विकारा आणि ड्रग्स सोडण्याचं वचन द्या. या केससाठी तुम्हाला कोणी फुलांचा गुच्छ घेऊन येणार नाहीये.''

भारती सिंह

जॉनी यांनी पुढे सांगितलं की, ''ड्रग्सचं सेवन तसंच आहे जसं आधी दारुचं व्हायचं. दारु खूप सहज मिळायची आणि त्यामुळे भरपूर पार्ट्या व्हायच्या. मी सुद्धा दारु पिण्याची चूक केली आहे. मात्र जेव्हा मला जाणीव झाली की दारु माझ्या टॅलेंट आणि क्रिएटीव्हिटीला खराब करतेय तेव्हा मी दारु पिणं सोडून दिलं. मात्र सध्या क्रिएटीव्ह लोकांचं ड्रग्स घेणं आत्ता प्रमाणाबाहेर गेलं आहे. जर तुम्ही ड्रग्स घेताना पकडला गेलात तर विचार करा तुमच्या घरच्यांची काय हालत होईल जे तुमची कहाणी टीव्हीवर बघत आहेत. जर हे ड्रग्स घेणं असंच सुरु राहिलं तर संपूर्ण इंडस्ट्री खराब होईल.''     

johnny lever reacts to bharti singh and haarsh limbachiyaas arrest in drug case  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: johnny lever reacts to bharti singh and haarsh limbachiyaas arrest in drug case