जोनिता गांधी आणि ऍश किंगचा मराठमोळा स्वर 

वृत्तसंस्था
गुरुवार, 6 जुलै 2017

हिंदीतील गायकांनी मराठी चित्रपटासाठी गाणं हे तसं काही नवीन राहिलेलं नाही. सध्याच्या आघाडीच्या गायकांमध्ये सोनू निगम, जावेद अली, श्रेया घोषाल अशी कितीतरी नावं घेता येतील. मराठी गाणी हिंदी चित्रपटसृष्टीतील गायकांनी गायल्यास ती गाणी उल्लेखनीय ठरतात आणि त्याची चर्चाही खूप होते. त्यामुळे अनेकदा असे प्रयोग केले जातात.

मराठीतील "ड्राय डे' हा चित्रपट त्याच्या हटके नावामुळे आधीपासूनच चर्चेत आहे; पण या चित्रपटासाठी प्रसिद्ध गायक ऍश किंग आणि जोनिता सिंग एक द्वंद्वगीत गाणार आहेत.

हे दोघे या चित्रपटातून मराठीत पदार्पण करणार आहेत. जोनिताने "ओके कनमनी' चित्रपटातील "मेंटल मनधिल', "दंगल' चित्रपटातील "गिलहारियॉं', "हायवे' चित्रपटातील "कहा हूँ मै' अशी गाजलेली गाणी गायलेली आहेत; तर ऍश किंगने "हाफ गर्लफ्रेंड' चित्रपटातील "बारीश', "आयशा'मधलं "सुनो आयशा', "ऐ दिल है मुश्‍कील' चित्रपटातील "अलीझेह' अशी अनेक गाजलेली गाणी गायली आहेत.

या दोघांनी "ड्राय डे' या चित्रपटातील गायलेल्या गाण्याला अश्‍विन श्रीनिवासन यांनी संगीत दिलं आहे. गार गार कोळशात उठावी ही आग कशी? हे गाणं जोनिता आणि ऍश किंग गाणार आहेत. पांडुरंग जाधव दिग्दर्शित आणि संजय पाटील निर्मित ड्राय डे चित्रपट 8 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. 

Web Title: Jonita Gandhi and Ash King's Maratha Vocal