Joram Durban Festival : मनोज वाजपेयीचा 'जोरम' डर्बन फिल्म फेस्टिव्हलमध्ये!

सिर्फ एक बंदा काफी है मध्ये मनोजनं जी भूमिका केली त्याचे वारेमाप कौतूक होताना दिसत आहे. अशातच मनोजच्या आणखी एका चित्रपटानं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
 Joram Durban Festival
Joram Durban Festivalesakal

Manoj Bajpayee film Joram to screen at Durban International Film Festival : भारतीय चित्रपट विश्वामध्ये असे काही कलाकार आहेत ज्यांनी आपल्या अभिनयानं वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्या कलाकारांचे दिसणे नव्हे तर त्यांचा अभिनय हा नेहमीच प्रेक्षकांसाठी चर्चेचा विषय राहिला आहे. सध्या बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता मनोज वाजपेयी हा त्याच्या जोराम नावाच्या चित्रपटांमुळे चर्चेत आला आहे. Manoj Bajpayee film Joram to screen at Durban International Film Festival

मनोजला बॉलीवूडमध्ये तीन दशकं पूर्ण झाली आहेत. तो सध्याच्या घडीचा प्रसिद्ध अभिनेता आहे. काही दिवसांपूर्वी त्याचा झी ५ वर सिर्फ एक बंदा काफी है नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. आसाराम बापूच्या त्या घटनेवर आधारित या चित्रपटानं परखडपणे तत्कालीन घटनेवर प्रभावी भाष्य केल्याचे दिसून आले.

Also Read - Shivrajyabhishek Sohala : परकीय जलचरांना वेसण घालणारे एकमेव भारतीय राजे म्हणजे

सिर्फ एक बंदा काफी है मध्ये मनोजनं जी भूमिका केली त्याचे वारेमाप कौतूक होताना दिसत आहे. अशातच मनोजच्या आणखी एका चित्रपटानं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याच्या जोराम नावाच्या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. पुढील महिन्यात जोराम नावाचा चित्रपट हा डर्बन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखवला जाणार आहे. जोरमच्या मेकर्सनं सोशल मीडियावर ही पोस्ट शेयर केली असून त्याला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

देवाशिष मुखर्जी दिग्दर्शित हा चित्रपट एक सायकोथ्रिलर असण्याचे सांगण्यात येत आहे. झारखंड राज्यामध्ये या चित्रपटाचे चित्रिकरण झाले असून त्यात आदिवासी, त्या समुदायावर होणारा अन्याय याविषयी भाष्य करण्यात आले आहे. याविषयी प्रतिक्रिया देताना मनोजनं देखील प्रतिक्रिया दिली आहे.

 Joram Durban Festival
The Kerala Story: आम्ही टिझरमधले आकडे बदलले नाही तर...द केरळ स्टोरी निर्मात्यांचा अजब दावा

मनोजनं त्याच्या प्रतिक्रियेमध्ये म्हटले आहे की, जोरमला जो आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरव मिळाला आहे त्यासाठी मी मेकर्सचा आभारी आहे. माझ्यासाठी ही खूप आनंदाची बाब आहे. येत्या काळात त्या महोत्सवामध्ये तो चित्रपट दाखवला जाणार आहे. आमचे दिग्दर्शक देबाशिष यांनी या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली आहे.

 Joram Durban Festival
Kerala Tour: तुम्हाला ही केरळच्या निसर्ग सौंदर्यात हरवायचं आहे? मग या ठिकाणांना नक्की भेट द्याच ...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com