Jubin Nautiyal: जुबिन नोटियाल अपघात, नक्की काय झालं?

शेरशाह चित्रपटातील राता लंबिया हे गाणं आठवतं? त्या गाण्यानं प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेतला होता.
Jubin Nautiyal
Jubin Nautiyalesakal

Jubin Nautiyal Accident: शेरशाह चित्रपटातील राता लंबिया हे गाणं आठवतं? त्या गाण्यानं प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेतला होता. त्यामुळेच की काय जुबिन हा कमालीचा लोकप्रिय देखील झाला. त्यापूर्वी त्याच्या दिल गलती कर बैठा है या गाण्यानं देखील जुबिन तरुणाईच्या सर्वाधिक आवडीचा गायक म्हणून लोकप्रिय झाला होता. आता त्याच्याबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

प्रसिद्ध गायक जुबिन नोटियालला गंभीर अपघात झाला असून आता त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जुबिन हा घरात शिडीवरुन घसरुन पडल्यानं त्याचे कमरेचे हाड मोडले आहे. जुबिनच्या डोक्यालाही गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेनंतर त्याच्या उजव्या हाताचे ऑपरेशन होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी जुबीनचे तू सामने आये नावाचे गाणे व्हायरल झाले होते. त्यानं ते गाणं प्रसिद्ध गायिका योहानीच्या बरोबर गायले होते. त्याचा आणि योहानीला कॉन्सर्टही नुकताच पार पडला.

तरुणाईमध्ये जुबिनचा चाहता वर्ग मोठा आहे. त्याला फॉलो करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. खासकरुन जुबिनचे एखादे व्हायरल होताच त्याला सोशल मीडियावर मिळणाऱ्या प्रतिक्रिया लक्ष वेधून घेताना दिसत आहे. जुबिनच्या अपघाताचे वृत्त कळताच त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांनी त्याच्यासाठी सहानुभूती व्यक्त करत तो लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना केली आहे.

Jubin Nautiyal
Ranveer Singh Video: सिद्धार्थसाठी रणवीर फाडफाड मराठी बोलला! चाहते खुश

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com