जुहीचे मातृप्रेम

वृत्तसंस्था
बुधवार, 3 मे 2017

"कुमकुम- एक प्यारा सा बंधन' या मालिकेतील कुमकुम या सोज्वळ व सशक्त महिलेच्या भूमिकेमुळे घराघरांत पोचलेली अभिनेत्री जुही परमार आठवतेय? 2013 नंतर ती कोणत्याही मालिका व चित्रपटात दिसली नव्हती.

मुलगी समायराच्या जन्मानंतर तिने इंडस्ट्रीतून ब्रेक घेतला होता. 2015 मध्ये "संतोषी मॉं' मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर कमबॅक केले. सध्या ती "कलर्स' वाहिनीवरील "शनि' मालिकेत आईची भूमिका साकारतेय. या मालिकेसाठी तिने तब्बल 17 किलो वजन घटवलेय. भलेही ती आता मालिकेत काम करत असली, तरी मुलीसोबत बराच वेळ घालवते. तिची काळजी घेते. नुकताच जुहीने तिच्या मुलीसोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.  

Web Title: Juhi Parmar with her daughter