पहलाज निहलानी यांच्या 'जुली 2' ला नो कट्स

टीम ई सकाळ
सोमवार, 4 सप्टेंबर 2017

मुंबई : सीबीएफसी अर्थांत सेंट्रल बोर्ड फाॅर फिल्म सर्टिफिकेशनचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी आता चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आणि वितरक बनले आहेत. अध्यक्षपदाची माळ गळ्यातून उतरल्यावर त्यांनी पुन्हा आपल्या व्यवसायात लक्ष घातले आहे. विशेष बाब अशी की अशावेळी त्यांनी जुली 2 हा चित्रपट निवडला. कमालीचा बोल्ड आणि थरारक असा असलेल्या चित्रपटाची चर्चा याच्या टीजर पासूनच होती. आता याचा ट्रेलर लाॅंच करण्यात आला. गमतीची बाब अशी की पहलाज यांच्या काळात सिनेमाला 80-80 कट सुचवणाऱ्या बोर्डाने जुली 2 ला मात्र एकही कट न सुचवता या चित्रपटाला ए प्रमाणपत्र दिले आहे. 

सोमवारी या चित्रपटाचा ट्रेलर लाॅंच झाला. त्यावेळी पत्रकारांनी सेन्साॅरने काहीच कट न सुचवल्याबद्दल पहलाज यांना छेडले असता, सेन्साॅरच्या या भूमिकेचं त्यांनी स्वागतच केलं. ते म्हणाले, आमचा सिनेमा प्रौढांनी पाहण्यासारखाच आहे. यात काहीप्रमाणात अंगप्रदर्शन आहे. पण ते अत्यंत योग्य पद्धतीने आणि सेन्साॅरचे सगळे नियम पाळणारे अाहे. नवोदित कलाकारांनी त्यासाठी तरी हा चित्रपट पाहावा. 

जुली 2 आॅफिशिअल ट्रेलर

जुली 2 या चित्रपटात राई लक्ष्मी, अनंत जोग, रवी किशन अशी मंडळी दिसणार आहेत. दिपक शिवदासानी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात असभ्य भाषा नसल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. 

Web Title: Julie 2 trailer is out with No cuts esakal news