सलमान खानवर का उखडला कबीर खान? Salman Khan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kabir Khan,Salman Khan

सलमान खानवर का उखडला कबीर खान?

सलमान खानच्या(Salman Khan) 'बजरंगी भाईजान' सिनेमानं अनेक पुरस्कारांवर नाव कोरलं होतं. सिनेमाच्या कथानकातच दम होता. के.वी.विजयेंद्र प्रसाद यांनी भारत-पाकिस्तान केंद्रस्थानी ठेवून त्यात नात्याची एक सुंदर गुंफण अशा पद्दतीनं केली होती की केवळ भारतीय नाही तर पाकिस्तानी लोकांनीही सिनेमाला डोक्यावर उचलून धरलं होतं. कबीर खान दिग्दर्शित या सिनेमाचा सीक्वेल येणार अशी अनेक दिवसांपासून चर्चा होती. या चर्चांना पूर्ण विराम तेव्हा लागला जेव्हा सलमाननं सीक्वेल येणार असं सांगितलं. इतक्यावरच तो थांबला नाही तर त्यानं सिनेमाचं नाव 'पवनपुत्र भाईजान' असेल असंही लगोलग सांगून टाकलं होतं.

हेही वाचा: अभिनेत्रीसोबत घातपात? शॉक सीक्वेन्स पाहून चाहते हैराण...

पण आता यावरनं आणखी एक वादाचा मुद्दा उठला आहे. सिनेमाचा दिग्दर्शक कबीर खान यानेच सलमानविषयी नाराजीचा सुर छेडला आहे. त्याचं झालं असं की सलमान खाननं त्याच्या वाढदिवशी मीडियाला दिलेल्या मुलाखतीतनं 'बजरंगी भाईजान'च्या सीक्वेलविषयी बोलून टाकलं होतं. पण आता कबीर खानच्या वक्तव्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. कबीर खान म्हणाला,''अजून 'बजरंगी भाईजान'च्या सीक्वेलविषयी निर्माते अजूनतरी विचार करीत नाहीत. विजयेंद्र सर स्क्रीप्टवर काम करणार हे जरी ठरले असले तरी त्यावर त्यांचं काम सुरू आहे, स्कीप्ट फायनल झालं नाही. किंवा नेमकी स्क्रीप्ट कशी असणार आहे ते ही ठाऊक नाही. त्यामुळे तोपर्यंत तरी सिनेमाचं नाव ठरणार नाही''.

हेही वाचा: सलमानसोबतच्या 'त्या' नात्यावर अखेर सामंथानं शिक्कामोर्तब केलं...

''सलमान भावनेच्या भरात बोलून गेला असेल. त्याला कदाचित सिनेमाचे प्रोटोकॉल्स माहीत नसतील अशी हसत-हसत कोपरखळीही कबीर खाननं मारली. तसंच,माझ्या सिनेमाचा सीक्वेल करायला मला आवडत नाही,जेव्हा पहिला भाग सुरपहीट ठरलेला असतो खासकरून तेव्हा. पण नवीन इंटरेस्टिंग स्टोरी सीक्वेलसाठी असेल तर निश्चितच मला आवडेल''. कबीर खाननं हे वक्तव्य केल्यामुळे सलमान त्यावर काय प्रतिक्रिया देतोय हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. पण मग लोकांच्या उत्साहाचं काय? कारण ते तर बिचारे खूश होते ऐकून की 'बजरंगी भाईजान'चा सीक्वेल येतोय. पण आता दिग्दर्शकच म्हणतोय, अजून काही ठरलेलं नाही तर काय करायचं राव. आता फायनल अनाऊंसमेंट होईपर्यंत वाट पाहण्यापलीकडे हातात काय आहे आपल्या.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top