'कबीर सिंग' फेम वनिता खरातची इच्छापूर्ती; घेतली आलिशान गाडी

'कबीर सिंग' मधील मोलकरणीच्या भूमिकेमुळे वनिताला विशेष पसंती मिळाली.
vanita kharat
vanita kharat facebook/vanita kharat

मराठी अभिनेत्री वनिता खरात (vanita kharat) ही वेगवेगळ्या भूमिकांमधून नेहमीच प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. 'महाराष्ट्राची हास्य जत्रा' या मराठी कॉमेडी शोमुळे तिला खूप प्रसिद्धी मिळाली. तसेच 'कबीर सिंग' या चित्रपटातील मोलकरणीच्या भूमिकेमुळे तिला विशेष पसंती मिळाली. कबीर सिंगमध्ये शाहिद कपूर सोबत वनिताने थोड्यावेळासाठीच स्क्रीन शेअर केली होता. पण तिच्या अभिनयातील विनोदी शैलीमुळे ती प्रेक्षकांच्या लक्षात राहिली. नुकतीच तिने एक आलिशान गाडी विकत घेतली आहे. या गाडीसोबतचा फोटो तिने सोशल मीडियावर शेअर करून त्याला कॅप्शन दिले, 'इच्छापूर्ती'. नेटकऱ्यांनी वनिताला शुभेच्छा दिल्या आहेत.(maharashtrachi hasya jatra actress vanita kharat buys a new car)

'महाराष्ट्राची हास्य जत्रा' या शोमधील वनिताच्या सहकलाकांनी तिच्या फोटोला कमेंट करून तिला शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री नम्रता संभेरावने वनिताच्या या फोटोला कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या. नम्रताने वनिताच्या फोटोला कमेंट केली, 'ही तर सुरूवात आहे, आता मजा येईल'. तर अभिनेता प्रसाद खांडेकरने कमेंट केली, 'मला तुझा अभिमान वाटतो, माझी बबडी. वनिता खूप खूप भारी वाटतंय, लईच प्रेम वने. कुटुंबातील नव्या सदस्याबद्दल तुझे अभिनंदन'

vanita kharat
जॅकलिनचं उद्योगपतीसोबत अफेअर; मुंबईतील आलिशान घरात राहणार एकत्र

वनिता सोशल मीडियावर नेहमीच अ‍ॅक्टिव्ह असते. सोशल मीडियावरील तिच्या न्यूड फोटोशूटमुळे वनिता चांगलीच चर्चेत होती. आपल्या वजनाचा न्यूनगंड न बाळगता वनिताने हे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले म्हणून अनेकांनी तिचे कौतुक केले होते. 'माझी आवड, माझा आत्मविश्वास, मला माझ्या शरीराचा अभिमान आहे. कारण मी मी आहे.' असं कॅप्शन वनिताने या फोटोला दिले होते.

vanita kharat
सायली संजीवची लगीनघाई सुरू?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com