मैफिलीत 'ती' कैफींना म्हणाली 'बद्तमीज' अन् अशी सुरु झाली त्यांची प्रेमकहाणी !

वृत्तसंस्था
मंगळवार, 14 जानेवारी 2020

कैफी आजमींनी प्रेमावर अनेक कवीता लिहिल्या शिवाय बॉलिवूड गीत आणि पटकथा यांचेही लेखन त्यांनी केलं. जितक्या मनवेधक त्यांच्या कवीता, शायरी आणि गाणी आहेत तितकीच गोड त्यांची प्रेमकथाही आहे. त्यांची आणि पत्नी शौकत यांची प्रेमकथा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

मुंबई : प्रसिद्ध कवी, गीतकार व समाजसेवक कैफी आझमी यांची आज 101वी जयंती! विशेष म्हणजे गूगल डूडलद्वारे त्यांना 101व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले आहे. गूगल नेहमीच समाजात मोठं स्थान असणाऱ्या दिग्गजांचा सन्मान आपल्या डूडलद्वारे करत असतं. आजही त्यांनी सुंदर डूडल तयार करत कैफी आझमींना अभिवादन केले आहे. कैफी आजमींनी प्रेमावर अनेक कवीता लिहिल्या शिवाय बॉलिवूड गीत आणि पटकथा यांचेही लेखन त्यांनी केलं. जितक्या मनवेधक त्यांच्या कवीता, शायरी आणि गाणी आहेत तितकीच गोड त्यांची प्रेमकथाही आहे. आज कैफींच्या 1012 व्या जयंतीनिमित्त त्यांची आणि पत्नी शौकत यांची प्रेमकथा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Happy #Fathers Day

A post shared by Shabana Azmi (@azmishabana18) on

कैफी आजमी यांचा जन्म उत्तर प्रदेशातील आजमगढ इथे झाला. त्यांचं पूर्ण नाव आहे सैयद अतहर हुसैन रिजवी म्हणजेच कैफी आजमी असं आहे. आपल्या अप्रतिम लिखाणाने त्यांनी लोकप्रियता आणि नाव कमावलं. वयाच्या 11 व्या वर्षी त्यांनी पहिली कविता केली होती. कैफी आजमी 1942 मध्ये झालेल्या महात्मा गांधींच्या 'भारत छोडो' आंदोलनाने प्रेरित झाले होते. त्यांनी बरचसं लिखाण आणि कविता हे प्रेमावर केलं. पण त्यांचीही प्रेमकथा काही कमी रोमॅंटिक नाही. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

You left us this day 16 years ago Abba but continue to surround us like the air we breathe..#Kaifi Azmi

A post shared by Shabana Azmi (@azmishabana18) on

तुम्हाला हे वाचून नक्कीच धक्का बसेल पण, भरलेल्या मैफिलीत कैफींच्या पत्नीने शौकत यांनी त्यांना 'बद्तमीज' असं म्हटलं होतं. त्याचं झालं असं की, कैफी आझमी हैदराबादमध्ये एका शायरीच्या मैफिलीत त्यांची 'उठ मेरी जान मेरे साथ ही चलना है तुझे' ही शायरी ऐकवत होते. त्याची पहिल्याच ओळीतील 'उठ' हा शब्द शौकत यांना काही रुचला नाही. शौकत म्हणाल्या,' यांच्यासारखे उद्धट शायर ज्यांनी ''उठ'' च्याऐवजी ''उठिये'' असं म्हणता येत नाही. कशी उद्धट शायर आहे ही व्यक्ती?'
अशाप्रकारे शौकत यांनी त्यांची प्रतिक्रिया तर व्यक्त केली. मात्र पुढे त्यांनी कैफींची संपूर्ण शायरी ऐकली आणि त्या थक्क झाल्या. शौकत यांना कैफींची शायरी भारीच पसंत पडली. ज्यांनी आधी मैफिलीत शायरीवर आपत्ती व्यक्त केली त्याच शौकत पुढे कैफी यांच्या पत्नी झाल्या. त्यांच्या या पहिल्या भेटीची प्रेमकथा कोण्या चित्रपटापेक्षा कमी नाही. 

Image may contain: 2 people, people smiling

कैफी आजमी यांची मुलगी म्हणजे अभिनेत्री शबाना आझमी होय. त्यांनी सोशल मीडियावर वडिलांसोबतचे काही गोड फोटो शेअर केले आहेत. 

Image may contain: 3 people, close-up and outdoor

शायर कैफी आझमींना गुगल डूडलकडून मानवंदना!

वाचा कैफी यांची 'ती' कविता...
'उठ मेरी जान मेरे साथ ही चलना है तुझे,
क़द्र अब तक तेरी तारीख़ ने जानी ही नहीं,
तुझमें शोले भी हैं बस अश्क़ फिशानी ही नहीं,
तू हक़ीकत भी है दिलचस्प कहानी ही नहीं,
तेरी हस्ती भी है इक चीज़ जवानी ही नहीं,
अपनी तारीख़ का उन्वान बदलना है तुझे,
उठ मेरी जान मेरे साथ ही चलना है तुझे,'
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kaifi Azmi and wife shaukat lovestory on his birth anniversary