ताजमहालच्या प्रेमात पडली काजल अगरवाल ; पाहा फोटो

वृत्तसंस्था
गुरुवार, 19 सप्टेंबर 2019

आग्रा : दाक्षिणात्य अभिनेत्री काजल अगरवाल हि नुकतीच ताजमहाल पाहायला गेली होती. ताजमहाल सोबतचे काही फोटो तिने इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले. विशेष म्हणजे हे फोटो शेअर करत असताना तिने प्रेमाविषयीचे विचार लांबलचक पोस्टद्वारे मांडले आहेत. शिवाय ताजमहालचं भरभरुन कौतुकही केलं आहे. साऊथमधील ती अतिशय सुंदर अभिनेत्री आहे यामध्ये काहीच शंका नाही. त्यातच ताजसोबतचे तिचे फोटो सध्या इंटरनेटवर चांगलेच व्हायरल होत आहेत. चाहत्यांकडून या फोंटोंना पसंतीदेखील मिळतेय.

आग्रा : दाक्षिणात्य अभिनेत्री काजल अगरवाल हि नुकतीच ताजमहाल पाहायला गेली होती. ताजमहाल सोबतचे काही फोटो तिने इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले. विशेष म्हणजे हे फोटो शेअर करत असताना तिने प्रेमाविषयीचे विचार लांबलचक पोस्टद्वारे मांडले आहेत. शिवाय ताजमहालचं भरभरुन कौतुकही केलं आहे. साऊथमधील ती अतिशय सुंदर अभिनेत्री आहे यामध्ये काहीच शंका नाही. त्यातच ताजसोबतचे तिचे फोटो सध्या इंटरनेटवर चांगलेच व्हायरल होत आहेत. चाहत्यांकडून या फोंटोंना पसंतीदेखील मिळतेय.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

#touristythings #worldsbeautifulplaces

A post shared by Kajal Aggarwal (@kajalaggarwalofficial) on

काजल 34 वर्षांची असून तीने पहिल्यांदाच ताजमहाल पाहिला. ती कुटुंबासोबत एन्जॉय करताना दिसली. प्रेमाचं प्रतिक असलेल्या ताजमहालला बघताक्षणी काजल त्या अप्रतिम वास्तूच्या प्रेमात पडली. त्याचा अनुभव चाहत्यांशी शेअर करत असताना फोटोंच्या कॅप्शनमध्ये तिनं प्रेमाविषयीचे विचार लिहिले. 'आजपर्यंत ताजमहालच्या सुंदरतेविषयी मी ऐकलं होतं. पण, आज पहिल्यांदा मी तो बघत आहे. ताजची मनमोहक सुंदरता पाहून मी खरच थक्क झाले आहे. हा क्षण नेहमीच माझ्या हृदयात राहिल.' असं मत तिने व्यक्त केलं. इतके वर्ष एकटं राहिल्यानंतर ताजला पाहिल्यावर माझ्या विचारांमध्ये बदल झालाय, असंही ती यावेळी म्हणाली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Witnessing this #symboloflove made me reflect upon this topic, taking this opportunity to share my thoughts : In a culture where we tend to place romantic love on a pedestal, we can easily overlook the dynamic ways to experience love. There's the depth of close friendships, the sense of belonging in a community, the intensity of an artistic practice, a connection to our work, or any experience that provides companionship, support, self-discovery, and even the feelings of both elation and misery. But this isn't the common narrative, so for many single people - me included - we can mistakenly think we're not good enough, or feel incomplete without this one, specific type of love. After many years spent berating my own single status, I could see how carelessly narrow my own view of love had been and how short-sighted it is to view romantic love as a prerequisite to a happy life. For many, being single is not about a lack of options for love, but a choice - a choice to apply a broader definition to love, and see the value in all its forms. (Also, Your happiness depends wholly on you, share that joy and completeness with your partner instead of thrusting the responsibility solely upon them) #enjoyingthesymboloflove #withpeopleilove #myvillage

A post shared by Kajal Aggarwal (@kajalaggarwalofficial) on

काजल साऊथ ते बॉलिवूड अशा अनेक चित्रपटांमध्ये झळकली आहे. ती 2011 मध्ये अजय देवगणसह 'सिंघम' या चित्रपटामध्ये दिसली. त्यानंतर 'स्पेशल 26' आणि 'दो लफ्जोंकी कहानी' अशा सुपरहिट चित्रपटांमधून तिने भूमिका साकारली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kajal Aggarwal Has Many Thoughts On Love And Being Single After Visiting Taj Mahal