माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा निर्णय मला घ्यावा लागतोय, काय झालं काजोलला Kajol takes break from social media | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kajol announces break from social media

Kajol: माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा निर्णय मला घ्यावा लागतोय, काय झालं काजोलला

Kajol announces break from social media: बॉलिवूडची दिग्गज आणि आघाडीची अभिनेत्री काजोल ही सतत चित्रपटांमध्ये सक्रिय असते. काजोल गेल्या काही दशकापासून चाहत्यांचं मनोरंजन करताना दिसत आहे.

काजोल हा हसlमुख आणि आनंदी स्वभाव चाहत्यांना खुप आवडतो. तिच्या चाहत्यांची संख्याही बरिच आहे. मात्र आता काजोल पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. त्यामागच कारणही तसचं काहीस आहे.

अभिनेत्री काजोलनं सोशल मीडियाला राम राम ठोकला आहे. काही काळापूर्वी काजोल इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. ती सोशल मीडियापासून लांब जात असल्याच तिनं या पोस्टमधुन म्हटलं आहे.

काजोलनं तिच्या इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाऊंटवर पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करताना काजोलने लिहिले की, ती तिच्या आयुष्यातील सर्वात कठीण परीक्षेचा सामना करत आहे. त्याचबरोबर या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिने सोशल मीडियापासून ब्रेक घेत असल्याचे लिहिले आहे. तिच्या सर्व पोस्ट इंस्टाग्राम फीडमधून गायब झाल्या आहेत. काजोलच्या या पोस्टमुळे तिच्या सर्व चाहत्यांना आता तिची चिंता होत आहे.

काजोलचे इंस्टाग्रामवर 14.4 मिलियन फॉलोअर्स आहेत. त्यासोबतच काजोल सोशल मीडियावर खूप सक्रिय देखील असते. तिच्या या पोस्टमुळे तिच्या चाहत्यांना आश्चर्य वाटले आहे. काजोलनं असं पाऊल का उचललं आणि आयुष्यातील सर्वात कठीण टप्प्याचा सामना करत आहे म्हणजे नेमक तिला काय म्हणायचं आहे असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले आहे.

तर दुसरीकडे काजोलने तिच्या आगामी चित्रपटासाठी हा एक प्रमोशनल स्टंट असल्याचंही अनेकांच मत आहे. काही काळापुर्वी काजोलने तिच्या 'दुष्मन' चित्रपटाला 25 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल एक खास पोस्टही शेअर केली होती.

काजोलच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती लवकरच लस्ट स्टोरीज २ मध्ये दिसणार आहे.