अभिनेता कमल हसन रुग्णालयातून घरी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 5 ऑगस्ट 2016

चेन्नई- ज्येष्ठ अभिनेता कमल हसन यांना रुग्णालयातून आज (शुक्रवार) घरी सोडण्यात आले. त्यांना दोन आठवडे विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्‍टरांनी दिला.

चेन्नई- ज्येष्ठ अभिनेता कमल हसन यांना रुग्णालयातून आज (शुक्रवार) घरी सोडण्यात आले. त्यांना दोन आठवडे विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्‍टरांनी दिला.

घरात जिन्यावरून घसरून पडल्याने कमल हसन यांना 14 जुलै रोजी अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पायावर शस्त्रक्रिया करण्यात आल्याने त्यांच्या आगामी "साबास नायडू‘ या विनोदी चित्रपटाचे चित्रीकरण पुढे ढकलले आहे. आता पुढील महिन्यात चित्रीकरण सुरू होईल. "साबास नायडू‘ हा चित्रपट एकाच वेळी तमीळ, तेलुगू व हिंदी भाषांत तयार होणार असून, कमल हसनच त्याचे दिग्दर्शक आहेत. मुख्य भूमिकेतही तेच झळकणार आहेत. रामया कृष्णन, श्रुती हसन, ब्रह्मानंद व सौरभ शुक्‍ला यांच्या यात भूमिका आहेत.

Web Title: Kamal hasan

फोटो गॅलरी
व्हिडीओ गॅलरी