कमल हासन आणि गौतमी यांचा काडीमोड

वृत्तसंस्था
बुधवार, 2 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली – दाक्षिणात्य सिनेअभिनेता कमल हसन आणि अभिनेत्री गौतमी यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला असून, मागील तेरा वर्षांपासून ते एकत्र राहत होते. हा निर्णय मला उद्‌ध्वस्त करणारा असला तरीसुद्धा आपण हसन यांच्या टॅलेंटचे कौतुक करत राहू, असे गौतमी यांनी म्हटले आहे.

हृदयाला तडे देणारे हे वास्तव स्वीकारण्यासाठी मला बराच कालावधी लागला, असे गौतमी यांनी आपल्या ब्लॉगवर प्रसिद्ध केलेल्या “लाइफ अँड डिसीजन‘ या शीर्षकाखालील लेखामध्ये म्हटले आहे. गौतमी यांनी दोन चित्रपटांमध्ये कमल हसन यांच्यासोबत सहनायिका म्हणून काम केले होते. मागील वर्षी प्रदर्शित झालेल्या “पापनाशनम‘ चित्रपटामध्ये ते दोघे एकत्र दिसले होते.

Web Title: kamal hasan and gautami separates