तर आत्महत्या करेन - केआरकेचा ट्विटरला इशारा

शुक्रवार, 3 नोव्हेंबर 2017

कमाल आर खान या स्वयंघोषित निर्माता, समीक्षकाने अनेक बाॅलिवूडच्या कलाकारांचे अपमान केले. अत्यंत हिडीस आणि असभ्य भाषेत हा चित्रपटांची समीक्षणे करत होता. अनेकांनी त्याच्याविरोधात ट्विटरकडे तक्रार केली होती. त्याची दखल घेत ट्विटरने त्याचं अकाउंट सस्पेंड केलं. पंधरा दिवसांपूर्वी हा सगळा प्रकार झाला. त्यानंतर केआरकेनं आपले अकाउंट सुरू व्हावं म्हणून हरतर्हेने प्रयत्न केले. पण सर्व प्रयत्न निष्फळ झाल्यावर मात्र त्याने ट्विटरलाच अल्टिमेटम दिला आहे. 

मुंबई : कमाल आर खान या स्वयंघोषित निर्माता, समीक्षकाने अनेक बाॅलिवूडच्या कलाकारांचे अपमान केले. अत्यंत हिडीस आणि असभ्य भाषेत हा चित्रपटांची समीक्षणे करत होता. अनेकांनी त्याच्याविरोधात ट्विटरकडे तक्रार केली होती. त्याची दखल घेत ट्विटरने त्याचं अकाउंट सस्पेंड केलं. पंधरा दिवसांपूर्वी हा सगळा प्रकार झाला. त्यानंतर केआरकेनं आपले अकाउंट सुरू व्हावं म्हणून हरतर्हेने प्रयत्न केले. पण सर्व प्रयत्न निष्फळ झाल्यावर मात्र त्याने ट्विटरलाच अल्टिमेटम दिला आहे. 

आमीर खानचा सिक्रेट सुपरस्टार रिलीज झाल्यानंतर केआरकेने या चित्रपटाची यथेच्छ धुलाई केली. त्यानंतर काही वेळात त्याचं अकाउंट सस्पेंड झालं. दुर्देवी बाब अशी की या चित्रपटाचा क्लायमॅक्सही केआरकेने फोडून टाकला. त्यामुळे सिक्रेट सुपरस्टारची टीम व्यथित झाली होती. पुढच्या काही वेळातच केआरकेचं अकाउंट ब्लाॅक झालं. केआरकेला हा प्रकार रुचला नाही. त्याने ते सुरू व्हावेत म्हणून अनेक प्रयत्न केले. पण काहीच साध्य होत नसल्याने त्याने ट्विटरला कायदेशीर नोटिस पाठवली आहे. त्यात पंधरा दिवसांत माझं अकाउंट परत सुरू करा अन्यथा मी आत्महत्या करेन असा इशारा दिला आहे. त्यानंतर जे काही होईल त्याला हे अधिकारी जबाबदार असतील असंही यात नमूद करण्यात आलं आहे. 

 

Web Title: kamal r khan twitter india suspended esakal news