तुमच्या जीवाची इथे कुणाला किंमत नाही - अभिनेत्री काम्या पंजाबी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 एप्रिल 2018

काम्याने आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'आपकी जान की यहाँ कोई किमत नही है, लोग भूल जाते है और आगे बढते है' 

बालिका वधू फेम अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिची काल पुण्यतिथी होती. या पार्श्वभूमीवर प्रत्युषाची जवळची मैत्रीण अभिनेत्री काम्या पंजाबी हिने इंस्टाग्राम अकाउंटवरुन श्रध्दांजली वाहिली. पण या श्रध्दांजलीत काम्याने प्रत्युषाच्या आत्महत्येवर राग व्यक्त केला. काम्याने आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'आपकी जान की यहाँ कोई किमत नही है, लोग भूल जाते है और आगे बढते है' 

'श्वास घ्या, जिवंत रहा. जिवन सुंदर आहे.' अशा आशयाची पोस्ट काम्या हिने लिहीली आहे. प्रत्युषा बॅनर्जी हिने 1 एप्रिल 2016 ला मुंबईत राहत्या घरी आत्महत्या केली होती. प्रत्युषा आणि काम्या बिग बॉस या रिअॅलिटी शोच्या दरम्यान भेटल्या होत्या.

प्रत्युषाच्या पहिल्या पुण्यतिथीला काम्याने 'हम कुछ कह ना सके' ही प्रत्युषाची शेवटची शॉर्ट फिल्म रिलिज केली होती. या शॉर्ट फिल्मची कहानी प्रत्युषाच्या वैयक्तिक आयुष्यातील बॉयफ्रेंडसोबत असलेल्या रिलेशनशीप मधील अडचणींशी मिळतीजुळती आहे. प्रत्युषाने बालिका वधू या मालिकेत तीन वर्ष मुख्य भुमिका साकारली आहे. शिवाय ती झलक दिखला जा 5 आणि बिग बॉस 7 या रिअॅलिटी शोज् मध्ये देखील सहभागी झाली होती.

Web Title: Kamya Panjabi Posts Emotional Message On Pratyusha Banerjees Death Anniversary