'चोरांना ज्यांची भीती वाटते त्यांचे नाव 'नरेंद्र मोदी' 

Kananga ranaut pm Narendra modi income tax department raid Anurag Kashyap actress -taapsee pannu
Kananga ranaut pm Narendra modi income tax department raid Anurag Kashyap actress -taapsee pannu

मुंबई -  दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेत्री तापसी पन्नु यांच्यामागील आयकर विभागाची रेड थांबण्याचे नाव काही घ्यायला तयार नाही. त्या कारवाईतून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. वास्तविक आताच्या कारवाईत अनुराग आणि तापसीचे नाव कसे हा प्रश्न त्या दोघांच्या चाहत्यांना पडला आहे. अभिनेत्री कंगणान आता या दोन कलावंतांवर टिप्पणी केली आहे. शांत राहिल ती कंगणा कसली, तिनं आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे अनुराग आणि तापसीवर टीका केली आहे. सोशल मीडियावर ती पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे.

अनुराग आणि तापसीच्या मुंबई आणि पुण्यातील 20 ठिकाणांवर आयकर विभागाचा पडलेला छापा यामुळे अनेकांचे लक्ष त्या दोघांकडे गेले आहे. नेमक्या याच सेलिब्रेटींवर कारवाई का असा प्रश्न यानिमित्तानं उपस्थित झाला आहे. त्यांचे आणि सध्याच्या सरकारचे असलेले संबंध कसे आहे हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. टॅक्स चोरी केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.आपल्या अभिनयामुळे तापसीनं कमी कालावधीत मोठ्या प्रमाणावर प्रसिध्दी मिळवली आहे. तापसी लॉकडाऊनच्या वेळी चर्चेत आली होती.

ज्यावेळी कोरोना वॉरियर्सच्या समर्थनार्थ पीएम मोदी यांनी देशातील नागरिकांना दिवे लावण्याचं आवाहन केलं होतं. तेव्हा तापसीनं लिहिलं होतं की, नवीन टास्क आला आहे. सर्वांनी दिवे लावून घ्या. तिच्या अशाप्रकारच्या भूमिकेमुळे ती ट्रोल झाली होती. तिचा सांड की आख नावाचा सिनेमा आला होता. तो काही चालला नाही. तेव्हाही ती प्रेक्षकांच्या टीकेचा विषय झाली होती. याशिवाय कंगणाचं आणि तिचं भांडण सर्वश्रृत आहे.

जेव्हा अनुरागची गँग्स ऑफ वासेपूर फिल्म प्रदर्शित झाली होती तेव्बा त्यातील काही दृश्यांमुळे त्या चित्रपटाला वादाचा सामना करावा लागला होता. दुसरीकडे त्याच्यावर पायल घोषनं मी टू चा केलेला आरोप सर्वांना धक्का देणारा होता. काही दिवसांपूर्वी अनुरागनं आपले सोशल मीडिया अकाऊंट डिलीट केले होते. अनुरागच्या मुलीवर अनेकांनी वेगवेगळ्या कमेंट केल्या होत्या. त्यामुळे परिवारात कुठलाही वाद नको म्हणून सोशल मीडियापासून फारकत घेतली होती.

अनुरागनं सीएए कायद्याला विरोध करताना गृहमंत्री अमित शाह यांना अपशब्द वापरले होते. दुसरीकडे कंगणावर टीका केल्यामुळेही तो चर्चेत आला होता. अशाप्रकारे हे दोन्ही कलावंत वादाच्या भोवती फिरणारे असून आता नव्यानं उदभवलेला वाद किती काळ टिकतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. कंगणानं व्टिट करताना त्या दोघांना चोर -चोर मोसैरे भाई असे म़्हटले आहे. यापुढे कंगणानं म्हटले की, जे चोर असतात ते फक्त चोरच असतात. मात्र जे देशाला विकून त्याचे तुकडे करु पाहत आहेत ते गद्दार आहेत. आणि जे गद्दारांना साथ देतात ते देखील चोर असतात. हे लक्षात ठेवा. चोरांना ज्यांच्यापासून भय वाटते तो कोणी साधारण मानव नाही. तर त्यांचे नाव नरेंद्र मोदी आहेत. 
 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com