कंगनाची 'धाकड'गिरी फुस्स..; आठवड्याभरात फक्त २० तिकीटांची विक्री

सिनेमा निर्मितीला ८० ते ९० कोटी रुपये खर्च तर कमाई केवळ ५ कोटी
Dhakad film Kangana Ranaut
Dhakad film Kangana Ranaut sakal

कंगना रनौतच्या स्टारर 'धाकड' सिनेमाची आठ दिवसात दिवसात केवळ 20 तिकीटं विकली गेलीय. आणि 4 हजार 420 रुपयांची कमाई केलीय. कंगना रनौतचा अॅक्शन फिल्म धाकड बॉक्स ऑफीसवर आपटलीय. बॉलिवूड हंगामाने हि माहीती दिलीय. धाकड रिलीजच्या दिवसापासूनच चालला नाही. धाकड सिनेमाने केवळ ३ कोटींची कमाई केलीय. (Kanagan Ranaut's Dhakad cinema sell 20 tickkets in aweek) 'धाकड' सिनेमासाठी निर्मात्याला 80 ते 90 कोटी रुपये खर्च आल्याचं सांगितलं जातंय. धाकड सिनेमाला थिएटर मिळत नसून, निर्मात्यांनी सिनेमा रिलीजपूर्वी त्या पद्धतीची डिल कली नसल्याने हे घडल्याचं बॉलिवूड हंगामाने बातमी दिलीय.

20 मे रोजी हा चित्रपट रिलीज झाला होता. रजनीश घई यांनी चित्रपट दिग्दर्शित केला. या चित्रपटात दिव्या दत्ता, अर्जुन रामपाल तसेच सास्वता चॅटर्जी ही स्टारकास्ट असून कंगना रानौत लीड रोलमध्ये आहे

देशभरात केवळ २५ सिनेमागृहात धाकड फिल्म दाखवली जातेय. कार्तिक आर्यन (Kartik aaryan) आणि कियारा अडवानीच्या भुलभुलय्या २ आणि धाकड चं रिलीज एकाचवेळी झाली. त्यात भुलभुलय्याची घौडदौड जोरात सुरुय. याउलट 'धर्मवीर' या मराठी सिनेमाने पहिल्याच आठवड्यात 13 कोटींची कमाई केली होती. या चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळतोय. मात्र बॉलिवूड सिनेमा 'धाकड' दणकून आपटलाय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com