कंगनाने सोशल मिडियावर हिमांशी खुरानाला केलं ब्लॉक

दिपाली राणे-म्हात्रे
Thursday, 3 December 2020

'तू भाजपाची प्रवक्त झाली आहेस का?' असा सवाल करत हिमांशीने कंगनावर जोरदार टीका केली होती.

मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. नुकतंच तिने दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला विरोध केला होता. तिच्या या भूमिकेवर अभिनेत्री हिमांशी खुराना हिने संताप व्यक्त केला होता. 'तू भाजपाची प्रवक्त झाली आहेस का?' असा सवाल करत तिने कंगनावर जोरदार टीका केली होती. अर्थात या टीकेमुळे संतापलेल्या कंगनाने हिमांशीला ट्विटरवर ब्लॉक केलं आहे.

हे ही वाचा: ...म्हणून अभिनेत्री पूजा सावंत डिलीट करते सोशल मिडीयावरील निगेटिव्ह कमेंट्स    

हिमांशी खुरानाने सोशल मिडिावर पोस्ट करत म्हणाली, “पंजाबी लोक प्रत्येकाचा आदर, सन्मान राखतात. पण वेळ आली तर जोरदार विरोध देखील करतात.” असं ट्विट करुन कंगनाने तिला ब्लॉक केल्याची माहिती हिमांशीने दिली. सोबतच तिने ब्लॉक केल्याचा एक फोटो देखील शेअर केला आहे. यापू्र्वी देखील टीका करणाऱ्या अनेक कलाकारांना कंगनाने ट्विटरवर ब्लॉक केलं आहे. या पार्श्वभूमीवर हिमांशीची ही पोस्ट सध्या सगळ्यांच लक्ष वेधून घेत आहे.

“ओह, आता ही भाजपाची प्रवक्ता देखील झाली का? कुठल्याही मुद्द्याला कसं फिरवायचं हिला आता चांगलंच जमतंय. बघा ना दंगल होण्याची शक्यता ती आधिच वर्तवतेय. मुख्यमंत्र्यांनी आधीच काहीतरी केलं असतं तर भर थंडीत घराबाहेर पडण्याची अशी वेळ आली नसती.” असं ट्विट करत हिमांशीने कंगनाला परखड बोल सुनावले होते.

kangana blocks himanshi khurana on twitter after she criticised her comments on ongoing farmer protests  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kangana blocks himanshi khurana on twitter after she criticised her comments on ongoing farmer protests