
Kangana Ranaut: 'खलिस्तानींच्या विरोधात कंगणाचा पुन्हा घणाघात! म्हणाली, '...लाज वाटते का?'
बॉलिवुडची क्वीन कंगणा राणावत ही तिच्या सडेतोड वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहे. कोणताही मुद्दा असो कंगणा त्यावर तिच मत मांडतेच. ट्विटरवर परत आल्यावर तिनं पुन्हा तिच्या वक्तव्याचा धडका सुरु केला. रोजच तिचं काही ना काही ट्विट चर्चेत असतचं.
काही दिवसांपुर्वी अमृतसरमधील अजनाळा पोलिस स्टेशनमध्ये मोठा गोंधळ झाला होता. 'वारीस पंजाब डे' या खलिस्तान समर्थक संघटनेचे प्रमुख अमृतपाल सिंग यांनी गोंधळ घातला यावर कंगणानेही सोशल मिडियावर पोस्ट शेअर करत तिची बाजू मांडली होती.
आता पुन्हा तिनं 'खलिस्तानी'वर फेसबुक पोस्ट टाकली आहे. यामध्ये तिनं तीन वर्षे जुनी घटना सांगितली आहे, जेव्हा त्याबद्दल बोलत असतांना तिला स्वतःला त्रासाला सामोरे जावे लागले होते.
कंगना रणौतने फेसबुकवर लिहिले, 'जेव्हा मी तीन वर्षांपूर्वी खलिस्तानी लोकांबद्दल बोलले होते, तेव्हा माझ्या सर्व ब्रँडने मला काढून टाकले, लाखो लोकांनी मला अनफॉलो केलं, डिझायनर्सनी माझ्या फोटोंसह त्यांच्या पोस्ट काढून टाकल्या आणि पूर्णपणे बंदी घातली. आज पंजाबमधील दहशत पाहून त्यांना लाज वाटते का?
कंगना पुढे म्हणाली, 'त्याने चूक केली असे त्याला वाटते का? की रक्त प्यायची तहान होती, कोणी प्यायलं, का प्यायलं, हे अप्रस्तुत आहे...? थोडी जरी माणुसकी असेल तर नक्कीच लाज वाटेल पण राक्षक असतील तर धर्म नष्ट करणं एवढचं त्यांचं काम आहे. अधर्म विजयी आहे, मग कोणतीही लाज वाटणार नाही... विचार करा आणि स्वतःला विचारा.'
कंगणानं यापूर्वी केलेल्या पोस्टमध्ये तीन वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेवर लिहिले होते की, 6 समन्स, एक अटक वॉरंट, पंजाबमध्ये माझ्या चित्रपटांवर बंदी, माझ्या कारवर हल्ला. देशाची एकता टिकवण्यासाठी राष्ट्रवादी व्यक्तीला ही किंमत मोजावी लागते. भारत सरकारने खलिस्तानींना दहशतवादी घोषित केले आहे. तुमचा राज्यघटनेवर विश्वास असेल तर त्यात शंका नसावी. आता तिच्या या नवीन पोस्टनं पुन्हा चर्चा सुरु झाल्या आहेत.