'माझ्यामुळे बॉलीवूडमध्ये आज...' कंगनानं तोडले अकलेचे तारे! |Kangana Ranaut | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kangana Ranaut Airport fashion look viral Instagram

Kangana Ranaut : 'माझ्यामुळे बॉलीवूडमध्ये आज...' कंगनानं तोडले अकलेचे तारे!

Kangana Ranaut Airport fashion look : बॉलीवूडची क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कंगनाचा रुबाब काही वेगळाच असतो. तिची फॅशन, स्टाईल तिचं व्यक्त होणं हे सारं काही चाहत्यांचे लक्ष वेधून घेणारे असते. दहा वर्षांहून अधिक काळ बॉलीवूडमध्ये कार्यरत असणाऱ्या कंगनानं स्वताच्या अभिनयानं वेगळी ओळख निर्माण केली आहे.

कंगना आता पुन्हा चर्चेत आली आहे. त्याचे कारण तिनं तिच्या फॅशनवर दिलेली प्रतिक्रिया.यामुळे तिनं पुन्हा एकदा लक्ष वेधून घेतले आहे. कंगनानं इंस्टावर तिचा एक लूक शेयर केला आहे. एअरपोर्टवर कंगना दिसली आणि तिचे फोटो पापाराझ्झींनी घेतले. त्यानंतर त्या फोटोविषयी कंगनानं दिलेली प्रतिक्रिया मात्र अनेकांच्या नाराजीचे कारण ठरली आहे. कंगनानं थेट बॉलीवूडमध्ये आपल्यामुळे कशाप्रकारे वेगळा ट्रेंड सुरु झाला याविषयी प्रतिक्रिया दिली आहे.

Also Read - Self Respect चा प्रवास दूराग्रहाकडे नको

आज एअरपोर्टवर अभिनेत्री ज्या वेगवेगळ्या लूक्समध्ये दिसतात त्याची सुरुवात माझ्यापासून झाली आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण हटक्या स्टाईलमध्ये एअरपोर्टवर फोटोग्राफर्सच्या चर्चेचा विषय असायचो. त्यानंतर आता त्याची जागा कित्येक अभिनेत्रींनी घेतली आहे. त्या फोटोवर कॅप्शन देताना कंगनानं लिहिलं आहे की, मीच वेड्यासारख्या त्या एअरपोर्टच्या लूक्सची सुरुवात केली होती. आता ती पुढे येताना दिसते आहे.

दुसऱ्या एका फोटोंविषयी लिहिताना कंगनानं म्हटले आहे की, अनेक संपादकांनी त्यांच्या फॅशन मासिकांमधून वेस्टर्न मॉडेलला प्राधान्य देण्यात आले. त्यातून जाहिरातींचा पूर आला. आणि आपणही त्यात मागे नाही. असे कंगनानं म्हटले आहे. मात्र यासगळ्यात आपण पर्यावरणाचा विचार करत नाही. आणि प्रत्येकाची फॅशनही वेगळी असल्याचे कंगनाचे म्हणणे आहे.

व्यवस्थेला मी फॅशनिस्ट मानते. काही जण माझ्यावर दरवेळी टीकाही करताना दिसतात. मात्र माझी भूमिका काय आहे हे कुणी जाणून घ्यायला तयार नाही. माझे लोकांना सांगणे आहे की, तुम्ही ज्यावेळी कुणावर टीका करता तेव्हा त्यामागील भूमिकाही समजून घेणे गरजेचे आहे. असे कंगनानं म्हटले आहे.