
Kangana Ranaut : 'अमिताभजी, कशाला घेता माझ्याशी पंगा, होईल दंगा!' कंगनानं टायगरलाही दिला दम
Kangana Ranaut Bollywood Actress Emergency movie : बॉलीवूडची क्वीन कंगना रनौत ही तिच्या बोल्डनेससाठी ओळखली जाणारी अभिनेत्री आहे. आपल्या परखड वक्तव्यामुळे कंगनाला अनेकदा ट्रोल व्हावे लागले आहे. तिनं आतापर्यत बॉलीवूडमधील अनेकांशी पंगा घेतला आहे. पंगा गर्ल म्हणूनही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे. आता तर तिनं थेट बिग बी अमिताभ बच्चन यांनाच आव्हान दिलं आहे. ज्याची चर्चा सुरु झाली आहे.
बऱ्याच दिवसांपासून कंगनाच्या नव्या चित्रपटाचे तिच्या चाहत्यांना वेध लागले आहे. भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाची निर्मिती ती करत असून त्यामध्ये कंगनानं इंदिरा गांधीजींची भूमिका साकारली आहे. यंदाच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे बोलले जात आहे. त्याच्या फर्स्ट लूक आणि टीझरला देखील प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.
Also Read - जाणून घ्या काॅन्ट्रा फंडातल्या गुंतवणुकीबाबत

Kangana Ranaut Bollywood Actress Emergency movie
कंगनानं यापूर्वी बॉलीवूडमधील खान कलाकारांना बॉलीवूड माफिया असे म्हटले होते. कुठला चित्रपट चालवायचा, कोणता फ्लॉप करायचा हे सगळं ते ठरवतात. असा आरोप कंगनानं केला होता. यानंतर कंगनानं आपला मोर्चा बिग बी अमिताभ बच्चन आणि टायगर श्रॉफकडे वळवला आहे. तिनं केलेलं वक्तव्य हे वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. असं कंगना बोलली तरी काय हे आपण जाणून घेणार आहोत.
कंगना आपल्या ट्विटमध्ये म्हणते, बॉलीवूड माफिया सध्या माझ्या आगामी इर्मजन्सी चित्रपटासोबत स्पर्धा करण्याचा विचार करते आहे. उगाचच दोन चित्रपट एकत्र कसे येतीला याकडे त्यांचा कल आहे. माझा चित्रपट २० ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. त्याचवेळी बिग बी अमिताभ बच्चन आणि टायगर श्रॉफ यांना देखील त्यांचा चित्रपट प्रदर्शित करायचा आहे. असे कंगनाचे म्हणणे आहे.
कंगनानं तिच्या ट्विटमध्ये बिग बी अमिताभ बच्चन, प्रोड्युसर भुषण कुमार आणि टायगर श्रॉफचे नाव घेतले आहे. मी जेव्हा माझ्या इर्मजन्सी चित्रपटासाठी रिलिज डेट शोधत आहे तर अशावेळी मला यावर्षी खूप तारखा मिळत आहे. त्यातून मी २० ऑक्टोबर ही तारीख शोधली आहे. मात्र आता लगेच भुषण कुमारनं त्याच दिवशी त्यांचा चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे.
पूर्ण ऑक्टोबर महिना फ्री आहे. अशावेळी बाकीच्या तारखा घेण्याऐवजी यांना मी घेतलेली तारीखच घ्यायची आहे. सप्टेंबर अख्खा रिकामा आहे. मला तर वाटतं आता बॉलीवूड माफियांच्या मिटींग्ज व्हायला सुरुवात झाली आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. असे कंगनानं म्हटले आहे.