
Kangana Ranaut : 'बच्चा मैं सब समझती हूं!' बॉलीवूड माफियांसमोर तुमचे तोंड का उघडत नाही? कंगनानं काढला जाळ
Kangana Ranaut bollywood actress now angry on paparazzi : कंगनाचा एक दिवस असा जात नाही की तिनं कुणाविषयी काही प्रतिक्रिया दिली नाही. सोशल मीडियाचा स्वताच्या इमेज ब्रँडिंगसाठी पुरेपुर वापर करणाऱ्यांमध्ये ती नेहमीच आघाडीवर असते. आपण जे बोलू त्यावर ठाम राहत वाट्टेल ते बोलणाऱ्या कंगणाची आणखी एक प्रतिक्रिया चर्चेत आली आहे.
प्रसिद्ध अभिनेत्री प्रियंका चोप्रा हे नाव सध्या चर्चेत आहे. तिनं तिच्या एका मुलाखतीमध्ये आपल्याला कोणेएकेकाळी बॉलीवूडनं बाहेर ठेवलं होतं. मुख्य प्रवाहात येऊ दिलं नव्हतं. असं म्हटलं होतं. त्यामुळे मी बॉलीवूड सोडणार होते. असा खुलासा तिनं केला होता. यावर कंगनानं तिच्या पद्धतीनं तिखट प्रतिक्रिया देत चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. यावेळी तिला काही पापाराझ्झींनी प्रश्न विचारताच त्यांना कंगनानं चांगलेच खडसावले आहे.
Also Read - जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??
कंगनानं तिला प्रश्न विचारणाऱ्या पापाराझ्झींना धारेवर धरले आहे. कुणी का म्हणेना पण कंगनाला डावलून बॉलीवूडच्या घडामोडींचा विचार करता येत नाही. बॉलीवूडमध्ये घडणाऱ्या घडामोडींवर कंगनाचा वेगळा प्रभाव पडत असल्याचे दिसून आले आहे. ती तिच्या प्रक्षोभक वक्तव्यांसाठी ओळखली जाणारी सेलिब्रेटी आहे. तिच्या वक्तव्याचा तिला अनेकदा फटकाही बसला आहे. मात्र ऐकेल ती कंगना कसली, याचा प्रत्ययही तिच्या चाहत्यांना आला आहे.

Kangana Ranaut
मुंबईच्या एअरपोर्टवर कंगना आल्यानंतर तिला पापाराझ्झींनी प्रश्न विचारण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी काही फोटोग्राफर्सनं तिचे फोटो काढण्यास सुरुवात केली. यावेळी कंगना म्हणाली, तुम्ही लोकं फार हुशार आहात. जेव्हा काही वाद होतो तेव्हा तुम्ही बॉलीवूड माफियांना अजिबात प्रश्न विचारत नाही. आणि माझ्यावरुन काही वाद झाला तर लगेच मला प्रश्न विचारुन भंडावून सोडतात. तुम्ही त्यांना प्रश्न का विचारत नाही. बच्चा मैं सब जानती हू, आणि मला सगळं समजतं. असे कंगनानं म्हटले आहे.
यापूर्वी कंगनानं काही ट्विटमधून प्रियंका चोप्रानं बॉलीवूड सोडण्यामागे करण जोहर जबाबदार असल्याचे म्हटले होते. तिनं लिहिलं होतं की, हे सगळ्यांना माहिती आहे की, प्रियंकाला बॉलीवूडमधून हद्दपार करण्यासाठी करण जोहरचा मोठा वाटा आहे. मात्र त्यावर कुणीही काही बोलत नाही.