
Kangana Ranaut: 'हिंदुत्वासाठी बोलली अन् करोडोंचं नुकसान झालं..', कंगनाचा धक्कादायक दावा
बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौत ही मनोरंजन विश्वातलं असं नाव आहे जे नेहमीच चर्चेत असतं. ती नेहमीच सोशल मीडियावर वेगवेगळ्या विषयांवर तिचं मत माडंत असते.
कंगना ही नेहमीच अनेक विषयावर तिचं परखड मत व्यक्त करत असते. मग ते राजकारण असो किंवा मनोरजंन विश्व तिची चर्चा तर होतेच. ती तिच्या पोस्ट आणि ट्विटवरुन अनेकांवर निशाणा साधत असते.
आता नुकताच कंगनानं एक धक्कादायक दावा केला आहे. तिने सांगितले की तिने राजकारणी, देशद्रोही आणि हिंदू धर्माच्या बाजूने आवाज उठवल्यामुळे तिचं खुप मोठं नुकसान झालं आहे, ज्यामुळे तिला अनेक ब्रँडमधून काढून टाकण्यात आलं.
कंगनाने इंस्टाग्रामवर इलॉन मस्कची एक बातमी शेअर केली आहे. यात इलॉन मस्कने म्हटले आहे की, मला जे पाहिजे ते मी बोलेन, भले मला आर्थिक नुकसान सहन करावं लागलं. आता त्याच हे विधान शेअर करताना कंगनाने तिला झालेल्या आर्थिक नुकसानाबद्दल नेटकऱ्यांना सांगितलं आहे.
कंगना राणौतने दावा केला आहे की हिंदू धर्मासाठी आणि राजकारणी आणि देशद्रोही यांच्या विरोधात बोलण्यासाठी तिला 20-25 ब्रँड एंडोर्समेंट खर्च करावे लागले.

हिंदुत्वासाठी बोलणे, राजकारणी, देशद्रोही, तुकडे टोळी यांच्या विरोधात वक्तव्ये केल्यामुळे तिला खुप नुकसान झालं. मला 20-25 ब्रँडच्या जाहिरातींमधून काढून टाकण्यात आले. त्यांनी मला रातोरात काढून टाकलं आणि यामुळे वर्षाला 30-40 कोटींचे नुकसान झाले, पण मी स्वातंत्र आहे आणि मला असं म्हणण्यापासून काहीही रोखू शकत नाही. असं तिने या पोस्टमध्ये लिहिलं आहे.
कंगना म्हणाली की, 'कंपन्या आणि त्यांचे कॉर्पोरेट ब्रँड हेड भारताच्या संस्कृतीचा आणि अखंडतेचा तिरस्कार करतात. मी मस्कचं कौतुक करते, कारण प्रत्येकजण त्यांच्या कमकुवतपणा दर्शवितो, कमीतकमी श्रीमंत व्यक्तीने पैशाची काळजी करू नये.'
कंगणानं पोस्ट शेअर करताच ती सोशल मिडियावर व्हायरल झाली आणि नेटकऱ्यांनी तिला प्रतिक्रिया देणं सुरु केलं आहे.
कंगणाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर कंगना लवकरच चंद्रमुखी 2 मध्ये दिसणार आहे. ब्लॉकबस्टर हिट तमिळ हॉरर कॉमेडी चित्रपट चंद्रमुखीचा हा पुढचा भाग असेल. कंगनाने नुकतेच 'इमर्जन्सी' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. या चित्रपटात ती माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारत आहे.