'मी आणि मस्क सारखेच!' कंगनाची ट्विटर मालकाला मस्का पॉलिश |Kangana Ranaut | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kangana Ranaut Compare Twitter owner Elon Musk

Kangana Ranaut : 'मी आणि मस्क सारखेच!' कंगनाची ट्विटर मालकाला मस्का पॉलिश

Kangana Ranaut Compare Twitter owner Elon Musk : बॉलीवूडची क्वीन म्हणून जिच्या नावाची चर्चा होते त्या कंगनानं आता तर कहरच केला आहे. नेहमीच वेगवेगळ्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावरुन लक्ष वेधून घेणाऱ्या कंगनानं आता तिची तुलना ट्विटरच्या मालकाशी केली आहे. त्यामुळे तिला नेटकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं आहे.

कंगनाला तिच्या बोलण्याचा फटका अनेकदा बसला आहे. त्यामुळे की काय ट्विटरनं तिचं अकाउंट बंद केलं होतं. दोन गटांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न कंगनानं यापूर्वी अनेकदा केल्याचे दिसून आले आहेत. यामुळेच की काय सोशल मीडियावरुन कंगनावर टीका होताना दिसते. आता तिनं ट्विटरचे सर्वेसर्वा एलन मस्क यांच्यासोबत तिनं स्वताची तुलना केली आहे.

Also Read - Silicon Bank दिवाळखोरीः भारतावर नाही होणार दीर्घकालिन परिणाम...का ते वाचा!

कंगनानं ट्विटरवर एक पोस्ट शेयर करुन आपण आणि एलन मस्क सारखेच आहोत असे म्हणत ते आणि सणकीच आहोत. असे म्हटले आहे. ती पोस्ट व्हायरल होताच नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.कंगनानं आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, तुम्हीच आम्हाला तुमचा आदर करण्यासाठी आणखी किती कारणं देणार आहात हे सांगाल का, यापूर्वी देखील कंगनानं एलन मस्क यांची स्तूती केल्याचे दिसून आले आहे.

कंगनाचे अकाउंट ब्लॉक केल्यानंतर एलन मस्क यांनी ट्विटरची सुत्रं हाती घेताच कंगनाचं अकाउंट सुरु केलं होतं. त्यानंतर कंगनाच्या व्हायरल झालेल्या पोस्टवरुन वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली होती. कंगनानं आता ट्विटर हे बेस्ट सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असल्याचे म्हटले आहे.