
कंगनाची बहीण रंगोलीने तिचा बर्थ डे साजरा केला. यावेळी कंगनाने रंगोलीला दिलेल्या बर्थ डे गिफ्टची चांगलीच चर्चा आहे. हे पाहुन कोणीही प्रेमात पडेल.
मुंबई- बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौत आणि तिची बहीण रंगोली चंदेल याचं नातं तर सगळ्यांनाच माहित आहे. दोघीही सोशल मिडियावर चांगल्याच ऍक्टीव्ह असतात. कोणत्याही परिस्थितीत एकमेकींच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहतात. नुकताच कंगनाची बहीण रंगोलीने तिचा बर्थ डे साजरा केला. यावेळी कंगनाने रंगोलीला दिलेल्या बर्थ डे गिफ्टची चांगलीच चर्चा आहे. हे पाहुन कोणीही प्रेमात पडेल.
हे ही वाचा: अभिनेत्री किम शर्माला डेट करत असल्याच्या चर्चांवर अमित साधने सोडलं मौन
अभिनेत्री कंगनाने बहीण रंगोलीला खूप क्युट गिफ्ट दिलंय ज्याचे फोटो तिने सोशल मिडियावर शेअर केले आहेत. रंगोली चंदेलच्या बर्थ डेला कंगनाने गुलाबी रंगाच्या रिबीनने सजवलेल्या एका सुंदर बकेटमध्ये एक क्युट कुत्र्याचं पिल्लू गिफ्ट केलं आहे. कंगनाने बुधवारी तिच्या चाहत्यांसोबत हे खास फोटो शेअर केले. त्या पिल्लुसोबत फोटो काढताना कंगना खूप आनंदी आहे तर रंगोलीच्या चेह-यावरही वेगळा आनंद पाहायला मिळतोय. बिगल जातीचा हे पिल्लु असुन खूप क्युट आहे.
कंगनाने तिच्या ट्विटवर हे फोटो शेअर करत रंगोलीला शुभेच्छा देत म्हटलंय, ''माझ्या एकुलत्या एका बहीणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.'' कंगनाने पुढे लिहिलंय, रंगोली नेहमी जरी आनंदी आणि चुलबुली असली तरी मला माहित आहे की खोलवर ती एक आई आहे. तेव्हा आमच्या कुटुंबात आणखी एका पाहुण्याचं आगमन झालंय. मित्रांनो भेटा आमच्या गप्पू चंदेलला.
इंस्टाग्रामवर गप्पूचे फोटो शेअर करत रंगोलीने लिहिलंय, ''मला नेहमीच एक पपी हवा होता पण तो केवळ तुझ्याकडूनंच. कारण माझ्या आयुष्यात ज्या काही सुंदर गोष्टी घडल्या आहेत त्या तुझ्याकडूनंच आलेल्या आहेत. मला आनंद आहे की तुला ती हिंट मिळाली जी मी तुला कित्येक वर्षांपासून देत होते. एवढ्या सुंदर गिफ्टसाठी आभार.''
kangana ranaut gift new guest in rangoli chandel family gappu chandel pictures out