ममतादीदींवर पुन्हा बरसली कंगना

बंगालमधील अटक नाट्यावर कंगनाची मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका
Mamta and Kangana
Mamta and Kangana

बंगालमधील विधानसभा निवडणुकीनंतर अभिनेत्री कंगना राणावत Kangana Ranaut हिने वादग्रस्त ट्विट केल्यानंतर ट्विटरने तिच्यावर बंदी घातली. असं असलं तरी कंगना इन्स्टाग्रामर सक्रिय असून तेथेही तिखट शब्दांत टीका करण्याची संधी तिने सोडलेली नाही. बंगालमधील कालच्या अटक नाट्यावर कंगनाने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी Mamata Banerjee यांच्यावर टीका केली. 'ममता त्यांच्या लाचखोर लोकांच्या बचावासाठी स्वतः ‘सीबीआय’च्या कार्यालयात गेल्या. लॉकडाउन तोडून ‘तृणमूल’चे हजार कार्यकर्तेही तेथे पोहोचले. सुरक्षा जवानांवर त्‍यांनी दगडफेक केली. ‘पश्‍चिम बंगालमधील लोकशाहीचे संरक्षक ममतांच्या अधीन आहेत,’ असा टोला कंगनाने लगावला आहे. (kangana ranaut lashes out at west bengal cm mamata banerjee)

अन्य एका इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एका ट्विटवर प्रतिक्रिया देताना ती म्हणाली की, 'आम्ही भाजपला पाठिंबा देतो म्हणजे मोदी किंवा अन्य कोणाला नाही तर तो भारताला दिलेला पाठिंबा असतो, हे लोकांनी समजून घ्यायला हवे. हा केवळ राष्ट्रवाद आणि बिगर राष्ट्रवादातील लढा आहे.'

Mamta and Kangana
'तू दोन धर्मात भांडण लावतेस…'; ईदच्या पोस्टमुळे कंगना ट्रोल

ट्विटरच्या नियमांविरुद्ध ट्विट केल्यानंतर कंगनाचा ट्विटर अकाऊंट कायमचाच बंद करण्यात आला. त्यानंतर तिने इन्स्टाग्रामचा आधार घेतला. मात्र इन्स्टाग्रामवरही तिला धक्का बसलेला आहे. स्वत:ला कोरोनाची लागण झाल्याची माहिती देताना कंगनाने कोरोनाला सामान्य ताप म्हटलं होतं. यानंतर इन्स्टाग्रामकडून तिची ही पोस्ट डिलिट करण्यात आली. विषाणूच्या हिचचिंतकांना कदाचित याबद्दल वाईट वाटलं असावं, अशी उपरोधिक टिप्पणी तिने यावर केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com