पंजाबी आजीनं कंगणाला डाफरलं, म्हणाली ' तु माझ्या शेतात कामाला ये'  

सकाळ ऑनलाईन टीम
Wednesday, 2 December 2020

आपणही एक महिला असून दुस-या महिलेविषयी बोलताना कंगणानं आदर बाळगायला हवा होता जो तिनं बाळगला नाही याचे वाईट वाटते. तिने माफी मागावी. 

मुंबई - दरवेळी वेगवेगळ्या प्रकारची भडकाऊ वक्तव्ये करुन चर्चेत राहणा-या कंगणाला शेवटी एका पंजाबी आजीनं जशास तसे उत्तर दिले आहे. तिला दिलेलं उत्तर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे. अखेर कोणीतरी तिला तिच्या भाषेत उत्तर दिल्याचं म्हटलं आहे. घटना कुठलीही असो त्याविषयी आपलं मत सोशल मीडियावरुन व्यक्त करण्याची घाई कंगणाला झालेली असते. यामुळे ती अनेकवेळा अडचणीत आली आहे.

दिल्लीत शेतक-यांचे जे आंदोलन सुरु आहे त्याला समाजातील वेगवेगळ्या स्तरातून पाठींबा मिळताना दिसत आहे. शेतकरी कायद्याच्या विरोधात हा शेतक-यांनीच एल्गार पुकारला आहे, त्यावरुन एक झालेल्या शेतक-यांच्या आंदोलनात पंजाबातील एक आजीही सहभागी झाल्या आहेत.

त्या आजींनी कंगणाचे कान टोचले आहेत. त्यामुळे एरवी इतरांवर सतत टीका करणारी कंगणाला आजीनं दिलेली शाब्दिक चपराक चांगलीच लागली आहे. ही आजी म्हणजे भटिंडाच्या जंडियां गावातील महिंदर कौर यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे.त्यांनी कंगणाला उत्तर दिलं आहे. त्या म्हणाल्या की, माझयाकडं 13 एकर जमीन आहे. त्यांना 100 रूपयांसाठी कुठेही जाण्याची गरज नाही. आणि हो कोरोनामुळे कंगणाला काही काम नसेल तर तिनं  माझ्या शेतात इतर मजूंराप्रमाणे काम करू शकते.

शेवटी बाईपण सोडून 'पुरुष' व्हावं लागलं, कित्येक वर्षांपासून होती त्रस्त

महिंदर कौर म्हणाल्या की, कंगणाला पंजाब आणि पंजाबच्या शेतकऱ्यांची समज नाही. ती असती तर तिनं अशाप्रकारचं वक्तव्य कधी केलं नसतं. तिनं केलेलं वक्तव्य म्हणजे  डोकं नसल्याचं लक्षण आहे. ती सरकारच्या भक्तीत मनात येईल ते बोलते. तिला इतकंही नाही माहीत की, कुणाबाबत काय बोलावं. जेव्हा तिचं मुंबईतील ऑफिस तोडलं गेलं तेव्हा पूर्ण पंजाबने तिला साथ दिली होती.

हे ही वाचा: लॉकडाऊन दरम्यान वाढल्या अभिषेकच्या 'या' भूमिकेतील अडचणी, चूक झाल्यास झाली असती मोठी गडबड  

आपणही एक महिला असून दुस-या महिलेविषयी बोलताना कंगणानं आदर बाळगायला हवा होता जो तिनं बाळगला नाही याचे वाईट वाटते. तिने माफी मागावी. पैशांसाठी काम करणारे शेतकरी आम्ही नाहीत, पैशांसाठी तेच काम करतात जे स्वत:ला विकतात. आम्ही भाडं घेणारे नाही तर लोकांना रोजगार देणारे आहोत'.

हे ही वाचा: गौहर आणि जैद 'या' दिवशी अडकणार विवाहबंधनात, वेडिंग कार्डची चर्चा  

पंजाबच्या वयोवृद्ध महिलेवर पैसे घेऊन शेतकरी आंदोलनात सहभागी झाल्याचा आरोप करणं तिच्या प्रतिमेसाठी वाईट ठरत आहे. 87 वर्षांच्या महिंदर कौर म्हणाल्या की, मी शेतात काम करते. जेव्हा शेतक-यांच्या न्यायासाठी लढा द्यायची वेळ आली त्यावेळी मी त्यांच्या पाठीशी उभी राहीले. माझ्या शेतकरी भावांसोबत याठिकाणी आली असून शेती करणं फार मोठी गोष्ट आहे. हे काही छोटं काम नाही. शेतातील प्रत्येक काम करण्याचा मी आनंद घेतला आहे. अशावेळी आपल्याला ज्या गोष्टीतील काही कळत नाही त्याबद्दल बोलायचं धाडस केल्यास त्याची किंमत चुकवावी लागते असेही त्या म्हणाल्या. 
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kangana ranaut news releted delhi agriculture