esakal | तापसीला कंगना म्हणली, 'She-Man'; नेटकऱ्यांनी केले ट्रोल

बोलून बातमी शोधा

Kangana ranaut

कंगना सोशल मीडियावर सक्रिय असते.

तापसीला कंगना म्हणली, 'She-Man'; नेटकऱ्यांनी केले ट्रोल
sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिध्द अभिनेत्री कंगना राणावत सोशल मीडियावरील तिच्या बोल्ड वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असते. अनेक वेळा तिला या वक्तव्यांमुळे ट्रोल केले जाते. नुकतच कंगनाने एक वादग्रस्त ट्विट केले आहे. ज्यामुळे नेटकरी तिच्यावर भडकले आहेत. प्रसिध्द अभिनेत्री तापसी पन्नूचा कंगनाने सोशल मीडियावर 'She-Man'असा उल्लेख केला आहे. एका ट्वीटमध्ये अभिनेत्री तापसी पन्नू ही अभिनेत्री कंगना राणावतची स्वस्त कॉपी करते, असे म्हटले होते. त्या ट्विटला रिप्लाय देत कंगना म्हणाली, "She-Man आज खूप खुश असेल."

ट्विटमध्ये कंगनाने तापसीचा 'She-Man' केल्याने तापसीचे चाहते कंगनावर भडकले. कंगनाच्या ट्विटला रिप्लाय करत अनेक नेकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे. ट्रोर्सला उत्तर देत कंगना म्हणाली, ‘She-Man असणं काही चुकीचं आहे का? मला वाटतंय की तापसीच्या मजबूत लूकची ही स्तुती आहे, तुम्ही नकारात्मक का विचार करताय हे मला समजत नाही.’ कंगनाने तिच्या वक्तव्याबद्दल माफी मागितली नाही तर उलट तिला ट्रोल करणाऱ्यांना उत्तर दिले, तसेच ती कशी बरोबर आहे आणि इतरांनी वक्तव्याचा कसा चुकीचा अर्थ लावला गेला हे सांगण्याचा प्रयत्न कंगनाने केला.

कंगना सोशल मीडियावर सक्रिय असते. नुकतेच कंगनाने सोशल मीडियावर चक्क पाकिस्तानचे कौतुक केले आहे. तिचे प्रत्येक ट्विट हा चर्चेचा विषय असतो. राजकारण असो वा बॉलिवूड कंगना प्रत्येक विषयीचे आपले मत ट्विटरच्या माध्यमातून मांडत असते. लवकरच कंगनाचा ‘थलायवी’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस योणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या चित्रपटातील ‘चली चली’ हे गाणे सध्या खूप गाजत आहे. यानंतर कंगना ‘तेजस’ आणि ‘धाकड’ हे दोन चित्रपटदेखील लवकरच प्रदर्शित होणार आहेत.