
Deepika Padukone At Oscar 2023: 'ती काही साधी गोष्ट नाही', कंगनाच्या तोंडुन दीपिका पदुकोणचं तोंड भरुन कौतुक
गेल्या अनेक दिवसांपासून अवघ्या जगाला उत्सूकता लागून राहिलेल्या प्रतिष्ठेचा ऑस्कर सोहळा आज संपन्न झाला. ऑस्कर 2023 मध्ये भारताने आपला ठसा उमटवला आहे. भारताने एक नव्हे तर दोन पुरस्कार जिंकले, तर अभिनेत्री दीपिका पदुकोण एक वेगळ्या अंदाजात दिसली.
दीपिका पदुकोणचे चाहत्यांकडून कौतुक होत आहे , मात्र आता अभिनेत्री कंगनाने तिला प्रशंसा मिळवून दिली आहे. कंगनाच्या या सरप्राईज चीअरने सर्वांनाच चकित केले.
95 व्या ऑस्कर पुरस्कर सोहळ्यात दीपिका काळ्या रंगाच्या गाऊन मध्ये दाखल झाली. तिच्या सौंदर्याचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. कंगनाने अभिनेत्री दीपिका पदुकोणचे कौतुक करत एक पोस्ट शेअर केली आहे.
दीपिकाचा एक व्हिडिओ शेअर करत कंगनाने ट्विट केले आहे की, "दीपिका पदुकोण किती सुंदर दिसत आहे, देशाचं प्रतिनिधित्व करत देशाचं नाव, प्रतिमा, ज्ञान आपल्या नाजूक खांदयावर घेत इतक्या आत्मविश्वासाने आणि सुंदररित्या तिथे उभं राहून बोलणं सोपं नाही. दीपिकाचं स्पीच भारतीय महिला बेस्ट आहेत हेच दाखवून देतं".
दीपिका पदुकोणने एसएस राजामौली यांच्या ब्लॉकबस्टर आरआरआरमधील 'नाटू नाटू' हे गाणे मंचावर सादर केले. दीपिका पदुकोणने 'नाटू नाटू' या गायक काल भैरव आणि राहुल सिपलीगुंज यांना स्टेजवर भव्य पद्धतीने सादर करण्यासाठी आमंत्रित केले. एवढेच नाही तर या परफॉर्मन्सला तिथे स्टँडिंग ओव्हेशनही मिळाले.
RRR च्या "नाटू नाटू" या गाण्याला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या श्रेणीत ऑस्कर मिळाला. हे गाणे एमएम कीरावानी यांनी संगीतबद्ध केले आहे, चंद्रबोस यांनी लिहिले आहे आणि राहुल सिपलीगुंज-काला भैरव जोडीने गायले आहे. हे गाणे सुमारे एक वर्षापूर्वी 2022 मध्ये रिलीज झाले होते. हे गाणे रिलीज झाल्यापासून खूप लोकप्रिय झाले होते.