जयललिता यांच्या बायोपिकसाठी कंगणा मनालीमध्ये करतेय 'अशी' तयारी !

Kangana Ranaut preparing for next film
Kangana Ranaut preparing for next film

मुंबई : बोल्ड आणि तितकीच स्पष्टवक्ती अशी ओळख असणारी बॉलिवूडची अभिनेत्री  म्हणजे कंगना रणौत. कंगना तिची मतं नेहमीच परखडपणे सर्वांसमोर मांडते. फक्त बॉलिवूड आणि अभिनयाचा विचार न करती ती सामाजिक, राजकीय अशा विषयांवरही बिनधास्तपणे बोलते. अनेकदा तिच्या वादग्रस्त विधानामुळे ती चर्चेचा विषयही ठरते. बी-टाउनमध्ये 'क्वीन' म्हणूनच तिची ओळख आहे. सध्या ती एका खास चित्रपटाच्या तयारीमध्ये व्यस्त आहे. जाणून घ्या नक्की तिचा आगामी चित्रपट आहे तरी काय? पाहा तिच्या तयारीचे खास फोटो आणि व्हिडीओ. 

कंगना सध्या एका चिपटाच्या तयारीत पूर्ण बुडून गेलीय. हा चित्रपट आहे तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या आयुष्यावर. कायम चर्चेत आणि वादात राहिलेल्या जयललिता यांच्यावरच्या या बायोपिकचं नावं आहे ‘थलाइवी’. याच चित्रपचासाठी कंगणा सध्या जीव तोडून मेहनत घेताना दिसत आहे. त्यासाठी ती सध्या मनालीमधल्या तिच्या घरी आहे. दिवाळीचं सेलिब्रेशनही तिनं त्याच घरी साजरं केलं. 'थलाइवी' सिनेमाची एक टीम कंगणासह मनालीमध्ये आहे आणि त्यांच्यासोबत ती दिवसेंदिवस मेहनत घेताना दिसत आहे. 

सध्या मनालीच्या घरीच ती डान्सची प्रॅक्टीस करत आहे. प्रॅक्टीस दरम्यानचा एक व्हिडीओ तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. यामध्ये कंगणा कोरीओग्राफरसोबत डान्स करताना दिसतेय. गुलाबी रंगाचा टि-शर्ट आणि पॅंटचा सुट, त्याचसोबत वेणी असा अंदाजात कंगणा नक्कीच क्युट दिसते आहे. कंगनाचं इन्स्टाग्राम अकाउंट ती स्वत: बघत नाही तर, तिची टीम हे अकाउंट सांभाळते. 

या चित्रपटाच्या शुटींगचा पहिला टप्पा कर्नाटकात पार पडणार आहे. हा चित्रपट तामिळ, तेलुगु आणि हिंदी अशा तीन भाषांमध्ये  रिलीज होणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन ए.एल. विजय हे करत आहेत. या चित्रपटासाठी कंगनाला दररोज काही तास द्यावे लागणार आहेत आणि  सिनेमासाठी खास मेकअपदेखील करावा लागणार आहे. 

याचवर्षी तिचा ऐतिहासिक चित्रपट 'मनिकर्णिका' प्रदर्शित झाला. बॉक्सऑफिसवर या चित्रपटाने चांगलीच कमाई केली. शिवाय राजकुमार रावसोबतचा 'जजमेंटल है क्या' हा चित्रपटदेखील याचवर्षी प्रदर्शित झाला. ‘थलाइवी’ची चर्चा ही फक्त बॉलिवूड आणि टॉलिवूडमध्येच नाही तर राजकीय क्षेत्रातही या चित्रपटाविषयी आणि कंगनाच्या भूमिकेविषयी जोरदार चर्चा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com